
Deepika padukone (फोटो सौजन्य- Instagram)
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई बनणार आहे. सप्टेंबरमध्ये अभिनेत्री तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असून यादरम्यान, दीपिका तिच्या मातृत्वाच्या फॅशनने लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली आहे. याआधी, कल्कीच्या लाँच इव्हेंटमध्ये दीपिका ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये चमकली होती. आणि आता ती अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात सुंदर जांभळ्या साडीमध्ये झळकली आहे.
नुकतीच ती अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात सहभागी होताना दिसली आहे. दीपिकाने जांभळ्या रंगाची साडी घातली होती ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. ऑर्गेन्झा फॅब्रिकपासून बनवलेल्या या भद्रा संजली काळ्या साडीवर चांदीचे धागे आणि ताऱ्यांनी केलेली भरतकाम आणखीनच अप्रतिम दिसत होते. त्यात दीपिकाचा क्यूट बेबी बंपही खूप हायलाइट होत होता. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. या फोटो मध्ये ती खूप सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. हे फोटो पाहून अभिनेता रणवीर सिंगने तिला कंमेंट दिली आहे.
रणवीरने केली कमेंट
दीपिकाने चोकर आणि स्लीक हेअर बन असलेली जांभळ्या आणि सिल्व्हर रंगाची साडी घातली होती. यासोबतच दीपिकाने एक मजेदार कॅप्शनही लिहिले – ‘आज शुक्रवारची रात्र आहे… बाळाला पार्टी करायची आहे.’ हे फोटो खरोखरच इतके सुंदर आहेत की तुम्हीही त्यांची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. दीपिकाने हे फोटो शेअर करताच पती रणबीर स्वत:ला रोखू शकला नाही. रणबीर म्हणाला, ‘हाय माझं बर्थडे गिफ्ट. मी तुझ्यावर प्रेम करतो.’ असे तो म्हणाला.
ज्योतिषाने भाकीत केले होते
रणवीर आणि दीपिकाचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. दोघेही लवकरच त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहेत. यापूर्वी सुप्रसिद्ध ज्योतिषी आणि फेस रिडर पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी दीपिका आणि रणवीरच्या मुलाच्या जन्माची भविष्यवाणी केली होती. गुरुजींनी सांगितले होते की दीपिका एका मुलाला जन्म देणार आहे आणि हे मूल दाम्पत्यासाठी खूप भाग्यवान असणार आहे.