
Deepika Padukone (फोटो सौजन्य-Instagram)
दीपिका पदुकोणने बुधवारी संध्याकाळी तिच्या बेबी बंपचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मोनोक्रोम चित्रांमध्ये, अभिनेत्री काळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये नेहमीप्रमाणेच जबरदस्त दिसते. ती हसताना आणि तिच्या बेबी बंपला सांभाळताना दिसत आहे. “ठीक आहे… आता मला भूक लागली आहे,” अश्या कॅप्शनसह तिने हि पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताच बॉलीवूड इंडस्ट्रीतील मित्रांनी अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले आहेत. आलिया भट्टने लिहिले, “गॉर्ज.” तसेच रकुल प्रीत सिंगने कमेंट केली, “उफ्फफफ मी बेहोश झाले.” तर, शिबानी अख्तर म्हणाली, “स्टनिंग.” आणि मसाबा गुप्ताने अनेक रेड हार्ट इमोटिकॉन टाकले. अश्या प्रकारे सगळे कलाकारांनी तिच्या वर प्रेम दाखवत तिला प्रतिसाद दिला.
खरं तर, दीपिकाने हा काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस ‘कल्की 2898 एडी’ या तिच्या प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाच्या इव्हेंटसाठी परिधान केला होता. या ड्रेस मध्ये दीपिका खूप सुंदर आणि आकर्षित दिसत होती. तसेच या ड्रेस मध्ये तिचे पोट बेबी बंपमुळे खूप क्युट वाटत होते. ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा गरोदर दीपिका पदुकोणवर खिळल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान दीपिका पदुकोणने शानदार एन्ट्री करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात दीपिका खूप आनंदी आणि मज्जा मस्ती करता दिसली.
दीपिकाचे नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या ड्रेसवरील फोटोज सुद्धा चर्चेत होते आता याच दरम्यान तिने या काळ्या रंगाच्या ड्रेस वरील फोटोज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. दीपिका चे सगळेच फोटोज व्हायरल होताना दिसतात परंतु हे बेबी बंपचे फोटोज जरा जास्तच चर्चेत आणि व्हायरल होताना दिसत आहेत.
तसेच दीपिका कल्की 2898 एडीमध्ये दिसणार असून, तिच्यासह अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास आणि दिशा पटानी सह कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याव्यतिरिक्त, ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिचा पुढचा प्रोजेक्ट द इंटर्न या चित्रपटाची तयारी करत आहे. ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. तसेच 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 27 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.