(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
तृप्ती दिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर ‘धडक २’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, परंतु हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करू शकला नाही. जरी त्याची कथा आणि स्टारकास्टच्या कामगिरीचे खूप कौतुक होत असले तरी, बॉक्स ऑफिसवरील कामगिरी निराशाजनक आहे. थंड सुरुवातीच्या वीकेंडनंतर, आता आठवड्याच्या दिवसांमध्ये या चित्रपटाची स्थिती वाईट आहे. ‘धडक २’ ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी किती कमाई केली हे आपण जाणून घेणार आहोत.
‘धडक २’ ने पाचव्या दिवशी केली किती कमाई?
‘धडक २’ अशा वेळी थिएटरमध्ये दाखल झाला जेव्हा संगीतमय रोमँटिक चित्रपट ‘सैय्यारा’ची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. अहान पांडे आणि अनित पद्डा यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीसमोर तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची जोडी फिकी पडली आहे. यामुळे ‘धडक २’ चित्रपट फ्लॉप झाला आहे. तसेच, ‘सन ऑफ सरदार २’ आणि ‘महावतार नरसिंह’ हे दोन्ही चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. आणि ‘धडक २’ ला हवे तसे कलेक्शन करताच आलेले नाही आहे. या चित्रपटाची स्थिती रिलीजच्या ५ दिवसांतच बिकट झाली आहे.
सुहास खामकरचे “राजवीर” चित्रपटातुन बॉलीवूडमध्ये पदार्पण, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, ‘धडक २’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ३.५ कोटींची कमाई केली. यानंतर, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ४.१५ कोटी आणि चौथ्या दिवशी १.३५ कोटींचा व्यवसाय केला. सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धडक २’ ने रिलीजच्या पाचव्या दिवशी १.६० कोटींची कमाई केली आहे. यासह, ‘धडक २’ ची ५ दिवसांत एकूण कमाई आता १४.३५ कोटी रुपये झाली आहे.
‘धडक २’ चे बजेट वसूल करणे कठीण
सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘धडक २’ चे अंदाजे बजेट ४५ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये सुमारे ३५ कोटी रुपये निर्मितीवर आणि १० कोटी रुपये मार्केटिंग आणि प्रमोशनवर खर्च करण्यात आले. कलाकारांची चांगली संख्या आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा असूनही, इतर चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाला कठीण स्पर्धा असल्याने बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पाच दिवस उलटूनही हा चित्रपट १५ कोटींची कमाई करू शकला नाही. अशा परिस्थितीत, चित्रपटाच्या कामगिरीकडे पाहता त्याचे बजेट वसूल करणे कठीण आहे.
‘नेटफ्लिक्स पेरेंट्स’ OTTच्या नव्या युगातील कुटुंबीयांची नवीन ओळख; याचा नक्की अर्थ काय? जाणून घ्या
‘धडक २’ स्टार कास्ट आणि कथा
‘धडक २’ हा एक रोमँटिक चित्रपट आहे ज्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट शाझिया इक्बाल दिग्दर्शित आहे आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने निर्मित केला आहे. हा २०१८ च्या ‘धडक’ चित्रपटाचा आध्यात्मिक सिक्वेल आहे. ‘धडक २’ हा आंतरजातीय प्रेम आणि सामाजिक अत्याचाराच्या थीमवर आधारित आहे. ‘धडक २’ हा प्रेक्षकांना आवडला तर आहे परंतु या चित्रपटाने हवे तसे कलेक्शन केले नाही आहे.