
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राकेश बेदी नक्की काय म्हणाले?
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, राकेश बेदी यांनी व्हायरल ट्रेलर लाँच व्हिडिओबद्दल उघडपणे सांगितले. ते म्हणाले, “सारा माझ्या वयाच्या अर्ध्यापेक्षा कमी आहे आणि तिने चित्रपटात माझ्या मुलीची भूमिका केली आहे. शूटिंग दरम्यान आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ती नेहमीच मला मिठी मारायची जसे मुलगी तिच्या वडिलांना मिठी मारते. आमचे चांगले नाते आहे, जे पडद्यावरही दिसून आले.”
व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना राकेश बेदी पुढे म्हणाले, “तो दिवसही वेगळा नव्हता. आम्ही दररोज अशी मिठी मारतो. पण लोकांनी ते चुकीच्या पद्धतीने घेतले. ते पाहणाऱ्याच्या नजरेत आहे. मी सार्वजनिक व्यासपीठावर तिला अयोग्यरित्या का किस करू? तिचे पालकही उपस्थित होते. लोक असे दावे करून खोटं पसरवतात आणि सोशल मीडियावर अनावश्यक गोंधळ उडवतात.” अभिनेता पुढे म्हणाला, “मी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत नाहीये, मी फक्त जे खरे आहे ते बोलत आहे.”
Avatar Fire and Ash X Review: जुनी गोष्ट, नवं रूप, जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार ३’ पाहून प्रेक्षक भावूक
साराने या चित्रपटात मुलीची भूमिका साकारली
“धुरंधर” मध्ये सारा अर्जुन राकेश बेदी यांची मुलगी यालिना जमालीची भूमिका साकारत आहे. साराचा हा बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट आहे जो मुख्य अभिनेत्री म्हणून आहे. तिने यापूर्वी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर सारा अर्जुनच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. या चित्रपटात सारा तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठ्या असलेल्या रणवीर सिंगसोबत रोमँटिक अंदाजात दिसली आहे आणि ही जोडी प्रेक्षकांना आवडली आहे.