Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अधिक गडद कथेसाठी व्हा सज्ज! ‘The Kerala Story 2′ मधील नव्या पोस्टरचे अनावरण

विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रॉडक्शन हाऊस "द केरळ स्टोरी २" चे नवे पोस्टर आता नुकतेच रिलीज झाले आहे. तसेच या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अशातच हा चित्रपट आता कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 01, 2026 | 12:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अधिक गडद कथेसाठी व्हा सज्ज
  • ‘The Kerala Story 2′ मधील नवं पोस्टर रिलीज
  • ‘The Kerala Story 2′ कधी होणार प्रदर्शित
 

विपुल अमृतलाल शाह यांच्या बहुचर्चित चित्रपट ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर पोस्टर्स नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, या पोस्टर्समुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांच्या व्यक्तिरेखा या पोस्टर्समधून समोर आल्या असून, त्या अधिक गडद, अधिक अस्वस्थ आणि भावनिकदृष्ट्या हादरवून टाकणाऱ्या असल्याचे स्पष्ट होते.

प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रत्येक पोस्टरमध्ये कलाकारांचा तीव्र क्लोज-अप दाखवण्यात आला आहे. चेहऱ्याचा अर्धा भाग बुर्क्यात झाकलेला असून, अश्रूंनी भरलेला डोळा आणि जखमांनी भरलेला चेहरा या दृश्यातून पात्रांच्या वेदना आणि मानसिक आघात प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. हे पोस्टर्स केवळ दृश्यात्मक न राहता, कथानकाच्या भीषण वास्तवाची झलक देतात.

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV मध्ये आरोपी कैद, पोलिसांचा तपास सुरू

निर्मात्यांच्या माहितीनुसार, ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’ ही तीन हिंदू मुलींची कथा आहे, ज्या प्रेमाच्या नावाखाली एका सुनियोजित कटात अडकतात. हळूहळू उलगडणारी ही कथा धर्मांतर, फसवणूक आणि मानसिक छळाच्या गंभीर वास्तवावर प्रकाश टाकते. पहिल्या भागाच्या प्रचंड प्रभावानंतर, हा सिक्वेल आणखी खोलवर जाणारा आणि प्रेक्षकांच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे नेणारा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मित केला असून, आशिन ए. शाह सहनिर्माते आहेत.

 

“द केरळ स्टोरी २” चा टीझर प्रदर्शित

विश्वास, आपुलकी आणि भावनिक नात्यांपासून सुरू झालेली ही गोष्ट लवकरच फसवणूक, नियंत्रण आणि अडकवून टाकण्याच्या भीषण कथेत बदलते. टीझरमध्ये स्पष्टपणे दिसतं की कसं प्रेमाला शस्त्र बनवलं जातं, ओळख हिरावून घेतली जाते आणि श्रद्धेला संघर्षाचं मैदान बनवलं जातं. संपूर्ण वातावरण तणावपूर्ण आणि अस्वस्थ करणारं असून, प्रत्येक दृश्य भीती आणि दडपलेल्या संतापाने भरलेलं आहे.

रश्मिका-विजयच्या लग्नासाठी उदयपूर सजला! सिटी पॅलेसमध्ये सुरु आहे जोरदार तयारी; Viral Video चर्चेत

‘द केरळ स्टोरी २’ च्या प्रदर्शनाची तारीख

‘द केरळ स्टोरी’ च्या जबरदस्त प्रभावानंतर, ज्याने आपल्या अढळ कथेने देशभरातील प्रेक्षकांना हादरवून टाकले, त्याचा सिक्वेल आणखी पुढे जाण्याचे आश्वासन देतो, आरामाच्या पलीकडे, शांततेच्या पलीकडे आणि नकाराच्या पलीकडे. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित, ‘द केरळ स्टोरी २’ ची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे, तर आशिष ए. शाह सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली सह-निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Vipul amrutlal shah the kerala story 2 character posters released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • the kerala story

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
2

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
3

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
4

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.