Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कांतारा चॅप्टर १’ ला तगडी टक्कर देत, ‘धुरंधर’ बनला 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट; पाहा Collection

रणवीर सिंग स्टारर "धुरंधर" या चित्रपटाने आपली कमाई सुरूच ठेवली आहे. चित्रपटाने १७ दिवसांत ५५५ कोटींचा आकडा ओलांडला असून, आता १८ व्या दिवशी "कांतारा चॅप्टर १" ला मागे टाकले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 23, 2025 | 09:35 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘कांतारा चॅप्टर १’ ला धुरंधरने दिली टक्कर
  • ‘धुरंधर’ बनला 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
  • ‘धुरंधर’ची १८ व्या दिवसाचे कलेक्शन
 

एका सत्य घटनेवर आधारित, “धुरंधर” हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी २८ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले आहे. त्यानंतरही त्याची कमाई कमी झाली नाही. १७ दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले. पहिल्या आठवड्यात त्याने २०७.२५ कोटी रुपये कमावले आणि दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २५३.२५ कोटी रुपये कमावले. आता, तिसऱ्या आठवड्यात, त्याच्या कमाईच्या चार्टमध्ये थोडी चढ-उतार पाहायला मिळत आहे. १८ व्या दिवशी सर्वात कमी कमाई झाली, परंतु आता धुरंधरने “कांतारा २” ला मागे टाकले आहे.

‘काश मैं 60 साल…’, वाढदिवसाआधी Salman Khanने व्यक्त केली ‘ही’ इच्छा, फोटो शेअर करत म्हणाला…

रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अली खान अभिनीत “धुरंधर” हा चित्रपट २८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. आदित्य धर यांच्या दुसऱ्या दिग्दर्शनातील या चित्रपटाने १७ दिवसांत भारतात ५५५ कोटी रुपये आणि जगभरात ८४७ कोटी रुपये कमावले आहेत. आता १८ व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहेत. चित्रपटाने किती कमाई केली आहे जाणून घेऊयात.

‘धुरंधर’ने १८ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?

सॅकनिकच्या मते, ‘धुरंधर’ने १८ व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या सोमवारी सुमारे १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जे १७ दिवसांतील सर्वात कमी होते. एकूण आता ५७१.७५ कोटी रुपये झाले आहेत, म्हणजेच ६०० कोटी रुपये गाठण्यासाठी थोडे अधिक काम करावे लागणार आहे. २५ डिसेंबर रोजी त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु, कार्तिक आर्यनचा देखील त्यादिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या दोघांची टक्कर पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

क्रिती सेननची धाकटी बहीण लवकरच अडकणार लग्नबंधनात! उदयपूरमध्ये पार पडणार लग्न, मुंबईत होणार रिसेप्शन

‘धुरंधर’ने ‘कांतारा: चॅप्टर १’ ला टाकले मागे

‘धुरंधर’ ने ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा: अ लेजेंड चॅप्टर १’ च्या जगभरातील ८५२.३१ कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकले आहे आणि २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. आता तो रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ ला देखील मागे टाकणार आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर जगभरात ९१५ कोटी रुपयांची कमाई केली होती. परंतु, जर आपण दोघांच्या १७ व्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर, त्यात लक्षणीय फरक आहे. संदीप रेड्डीच्या चित्रपटाने १४.५ कोटी रुपये कमावले, तर आदित्य धरच्या चित्रपटाने ३८.५ कोटी रुपये कमावले. यावरून असे दिसून येत आहे की ‘अ‍ॅनिमल’ या कमाईत पुढे आहे.

 

Web Title: Dhurandhar surpasses rishab shetty kantara chapter1 on box office collection day 18

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • Bollywood
  • Ranveer Singh
  • Rishabh Shetty

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.