(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेता रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला ‘कुली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आजकाल पॅन इंडिया चित्रपट म्हणजे चित्रपटात सर्व भाषांमधील स्टार अभिनेत्याचा समावेश करणे हा एक टेम्पलेट बनला आहे. याचदरम्यान ‘कुली’ चित्रपटामध्ये बॉलीवूड स्टार आमिर खान झळकताना दिसला. तसेच या चित्रपटाबाबत आमिर खानचे एक स्टेटमेंट सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अभिनेता आमिर खानने ‘कुली चित्रपटात काम करणे ही माझी मोठी चूक…’असं म्हटलं आहे. आता या मागचं सत्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
तेलगू सुपरस्टार नागार्जुन, कन्नड सुपरस्टार उपेंद्र, मल्याळम स्टार सौबिन शाहीर, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आमिर खान आणि तमिळ स्टार सत्यराज हे सगळे कलाकार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसले. या सगळ्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेडे केले. केथी आणि विक्रम सारख्या हिट चित्रपटांनंतर, लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘कुली’ १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि आता हा चित्रपट अमेझॉन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
दरम्यान, या चित्रपटात विशेष भूमिका साकारणाऱ्या बॉलीवूड स्टार आमिर खानबद्दलची एक बातमी इंटरनेटवर व्हायरल होत आहे की त्याने या चित्रपटात काम करणे ही त्याची सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. हे खरे आहे का? ‘कुली’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये आणि आता ओटीटीवर प्रदर्शित झाल्यापासून, इंटरनेटवर याबद्दल चर्चा सुरू आहेत. हा रजनीकांतचा १७१ वा चित्रपट आहे, जो सुमारे ३७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित, ही गुन्हेगारी गाथा कलानिधी मारनच्या सन पिक्चर्सने तयार केली आहे.
‘मी गांभीर्याने घेत नाहीये…’ दिशा पटानीच्या घरावर गोळीबार, वडील जगदीश पटानी यांचे समोर आले विधान
या चित्रपटात आमिर खान देखील मुख्य भूमिकेत दिसला आहे. आमिर खानने फक्त १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी करोडोंची कमाई केली आहे. त्याने चित्रपटात ‘दाहा’ नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारली होती. वृत्तानुसार, या छोट्या भूमिकेसाठी त्याला २० कोटी रुपये मिळाले. खरं तर, आमिर खानने असे विधान केल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. आतापर्यंत, तपासानुसार, ही एक संपादित बनावट बातमी असल्याचे समोर आले आहे.