Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’मध्ये वरुण धवननंतर दिलजीत दोसांझने केली एन्ट्री, अभिनेता बनणार बटालियनचा भाग!

दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा 'बॉर्डर' हा सिनेमा कोणी विसरूच शकत नाही. चाहत्यांना देशप्रेमाने वेडे करणारा बॉर्डरचा सिक्वल बॉर्डर 2 ची घोषणा करण्यात आली आहे. सनी देओल या चित्रपटाचा मुख्य अभिनेता आहे पण त्याच्यासोबत इतर कलाकारांबाबत एक चर्चा रंगली आहे. आता बॉर्डर 2 साठी एका प्रसिद्ध स्टारचे समोर आले आहे. या चित्रपटामध्ये वरुणसह आणखी एक बॉलीवूड सुपरस्टार पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 06, 2024 | 03:42 PM
(फोटो सौजन्य- Social media)

(फोटो सौजन्य- Social media)

Follow Us
Follow Us:

1997 मध्ये सनी देओल स्टारर चित्रपट बॉर्डरने यशाचे नवे उदाहरण ठेवले होते. दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या देशभक्तीपर चित्रपटात भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दाखवण्यात आले आहे. काही काळापूर्वी बॉर्डर म्हणजेच बॉर्डर 2 च्या सिक्वेलची घोषणा झाली आणि मुख्य अभिनेता म्हणून सनी देओलचे नाव निश्चित झाले. दुसरीकडे, बॉर्डर 2 च्या इतर स्टारकास्टची चर्चा देखील होत आहे. आता बातम्या येत आहेत की, अभिनेता वरुण धवन बॉर्डरच्या सिक्वेलमध्ये उतरणार आहे.

‘बॉर्डर 2’मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री
गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ ‘बॉर्डर 2’ च्या कलाकारांमध्ये सामील झाला आहे. सनी देओलच्या नेतृत्वाखालील या चित्रपटात वरुण धवन देखील दिसणार आहे. सनी देओलने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. दिलजीत सांझचे स्वागत करणारा व्हिडिओ शेअर करत सनी देओलने लिहिले, “फौजी दिलजीत दोसांझचे ‘बॉर्डर 2′ बटालियनमध्ये स्वागत आहे.” व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीत दिलजीतचा आवाज ऐकू येतो जिथे तो म्हणतो, “इस देश के तरफ उठने वाली हर नजर झुक जाती है खौफ से, इन सरहदो पर जब गुरु के पास पेहरा देते है.’ असा दिलजीत दोसांझचा आवाज ऐकू येत असून हा व्हिडीओ शेअर केला आहे. वरुण धवननंतर आता चाहत्यांना दिलजीत दोसांझचा देखील या चित्रपटामध्ये अभिनय पाहायला मिळणार आहे. त्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

 

हे देखील वाचा- ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीने लावली पाण्यात आग, अरबाजच्या हृदयावर केले वार!

बॉर्डर २ मध्ये दिसणार वरुण धवन
सध्या वरुण धवन ‘स्त्री 2’ या हॉरर कॉमेडी चित्रपटातील कॅमिओमुळे चर्चेत आहे. आता बॉर्डर २ बाबतही त्यांच्या नावाची चर्चा तीव्र झाली आहे. पिंकविलाच्या बातमीनुसार, वरुण सनी देओलसोबत बॉर्डर 2 मध्ये दिसणार आहे. तसेच वरुणसह आणखी एक अभिनेता सनी देओलसोबत एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. बॉर्डर 2 साठी वरुणचे नाव समोर आल्याने मनोरंजन वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचे वडील डेव्हिड धवन आणि भाऊ रोहित धवन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. एक स्टार किड म्हणून वरुण धवनने 2012 मध्ये निर्माता करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश केला.

Web Title: Diljit dosanjh joins sunny deol for border 2 after varun dhawan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Border 2 Movie
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

R Madhavan: शूटिंगमधून वेळ काढत आर. माधवन पोहोचला यूएस ओपनमध्ये; दिग्गजांसोबत घेतला खास अनुभव
1

R Madhavan: शूटिंगमधून वेळ काढत आर. माधवन पोहोचला यूएस ओपनमध्ये; दिग्गजांसोबत घेतला खास अनुभव

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा
2

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा

Sharat Saxena: उभं राहून MRI करणाऱ्या शरत सक्सेनांचे फोटो चर्चेत; सर्जरीपूर्वी चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
3

Sharat Saxena: उभं राहून MRI करणाऱ्या शरत सक्सेनांचे फोटो चर्चेत; सर्जरीपूर्वी चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन
4

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.