फोटो सौजन्य - Social Media
दिनेश विजानचा मॅडॉक फिल्म्सचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यात जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दिनेश विजानचा मॅडॉक फिल्म्सचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यात जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.
उत्तर-दक्षिण भेटीची कहाणी
‘परम सुंदरी’ चित्रपटातील एक नवीन प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा उत्तर भारतातील परम नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर जान्हवी कपूरने दक्षिण भारतातील सुंदरी नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. या दोघांमध्ये प्रेम कसं होतं हे या चित्रपटाची कथा आहे. याआधीही अशा विषयांवर चित्रपट बनले आहेत, पण दिनेश विजान आणि तुषार जलोटा हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगणार आहेत. आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टर आणि लूकमध्ये जान्हवी आणि सिद्धार्थ मल्होत्रा खूप छान दिसत आहेत, त्यांच्यातील केमिस्ट्रीही चांगली दिसत आहे.
केरळमध्ये चित्तथरारक दृश्ये पाहायला मिळतील
‘परम सुंदरी’ चित्रपटात केरळही दाखवण्यात येणार आहे, तिथले सौंदर्यही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तुम्हाला हसवेल आणि रडवेल अशी प्रेमकथाही दाखवली जाणार आहे. हा चित्रपट देखील मॅडॉकच्या इतर चित्रपटांप्रमाणे यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. मॅडॉक फिल्म्सने यावर्षी ‘स्त्री 2’, ‘मुंज्या’ आणि ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहेत.
All Things Sweet: सोनी बीबीसी अर्थ ख्रिसमसला उलगडणार स्वादिष्ट गुपिते; रिलीज करणार अप्रतिम मालिका!
या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे
दिनेश विजन यांनी ‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तुषार जलोटा यांच्याकडे सोपवली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 25 जुलै 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक प्रेमकथा आहे, पण यात ही कथा थोड्या वेगळ्या शैलीत सांगितली जाणार आहे. ‘परम सुंदरी’ चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणार असल्याचे सांगितले जात आहे.