फोटो सौजन्य - Social Media
ख्रिसमस म्हणजे आनंदाचे पर्व, आणि ते साजरे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सणाच्या गोड-गोड पदार्थांचा आनंद लुटणे. सोनी बीबीसी अर्थ असाच एक अप्रतिम कार्यक्रम घेऊन येत आहेत. ज्याचे नाव आहे ‘ऑल थिंग्ज स्वीट’. ही एक अतिशय मनमोहक मालिका आहे ज्यामध्ये आपल्याला गोड पदार्थ कसे बनविले जातात हे समजणार आहे. संपूर्ण दिवसभर चालणारी ही मालिका ख्रिसमस साठीचे गोड पदार्थ बनविण्यामागचे तंत्र आणि कला या दोन्हीचे खोलवर विश्लेषण करणार आहे.
ही मालिका प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मिष्टान्नांपैकी एक- आईसक्रीम बनण्याच्या गोड प्रवासावर घेऊन जाईल. यामध्ये स्कॉटलंडमधील एका कुटुंबाद्वारे चालविण्यात येणाऱ्या आईसक्रीमच्या फॅक्टरीचा, स्प्रिंकल्स बनवायच्या तंत्राचा, आणि नॉन-ड्रिप आइस कँडीसचा अविष्कार आदींचा समावेश असणार आहे. त्यानंतर मालिका केकबद्दल माहिती सांगणार आहे. ज्यामध्ये अतिशय नामांकित जाफा केकस जे संत्र्याच्या जेली पासून सुरुवात होऊन मऊ-मुलायम स्पॉंजरूपी चॉकलेट केक मध्ये रूपांतरित होतात, त्यांचा समावेश या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
मालिकेतील एक भाग हा विशेषत: चॉकलेट तयार करण्याच्या विज्ञान आणि कलेबद्दल असेल, ज्यामध्ये स्वाद आणि पोत यांच्या एकसंधपणाचे महत्व सांगितले जाणार आहे. या मालिकेतून चॉकलेटच्या बियांचा सुरू झालेला प्रवास रुचकर चॉकलेटपर्यंत येऊन कसा थांबतो हे प्रेक्षक आकर्षक दृश्यांच्या माध्यमातून अनुभवू शकतात. हे वेगवेगळे गोड पदार्थ कसे बनवले जातात या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
याव्यतिरिक्त काही मनोरंजक भागांमध्ये प्रती मिनिट होणारे २००० मिंसचे उत्पादन, चेरी हेंले सोबत टिंसेल तयार करण्याची प्रक्रिया, आणि रूथ गुडमॅनने सांगितलेला ख्रिसमस क्रॅकरचा स्फोटक इतिहास अशा विविध गोष्टींचा समावेश असेल. या मनमोहक आणि रुचकर प्रवासाचा शेवट चॉकलेटच्या मोठ्या पुतळ्यांच्या निर्मितीमागची कथा सांगून होईल. ‘ऑल थिंग्ज स्वीट’ ही मालिका तुम्हाला सोनी बीबीसी अर्थ २५ डिसेंबर रोजी सकाळी ९:०० वाजल्या पासून रात्री ८:०० वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे.