फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता अनिल कपूरच्या चाहत्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक गिफ्ट मिळाले आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘सुभेदार’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. प्राइम व्हिडिओने खरंतर अनिल कपूरला त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट दिली आहे. आणि त्यांचा ‘सुभेदार’ चित्रपटामधील जबरदस्त लुक शेअर केला आहे. ही झलक पाहून चाहते देखील चकित झाले आहेत.
अनिल कपूरच्या चाहत्यांचा दिवस खास बनला
अनिल कपूर हे आज मंगळवार 24 डिसेंबर रोजी 68 वर्षांचे झाले आहेत. प्राइम व्हिडिओने हा खास प्रसंग चाहत्यांसाठी अधिक खास बनवला आहे. वास्तविक, OTT प्लॅटफॉर्मने ‘सुभेदार’ चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे. ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटात अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत राधिका मदन त्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाची कथा काय असेल हे जाणून घेणे उत्कंठाचे ठरणार आहे.
सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला ६ महिने पूर्ण! अभिनेत्रीने खास नवऱ्यासाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट…
हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
प्राइम व्हिडिओने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘सुभेदार’चा फर्स्ट लूक शेअर करताना लिहिले आहे की, “खास दिवशी विशेष घोषणा होणे स्वाभाविक आहे.” ओपनिंग इमेज फिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क (AKFCN) यांनी मिळून ‘सुभेदार’ चित्रपटाचा फर्स्ट लुक सादर केला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. सध्या रिलीजची तारीख समोर आलेली नाही. चाहते ती लवकरच जाहीर करणार आहेत.
अनिल कपूर हातात बंदूक घेऊन दिसले
‘सुभेदार’ या चित्रपटात अनिल कपूर वेगळ्या आणि नव्या अंदाजात दिसणार आहेत. पहिल्या लूकमध्ये ते हातात बंदूक घेताना दिसले आहेत. अभिनेत्याचा हा चित्रपट सुभेदार अर्जुन मौर्य यांची कथा दाखवतो. नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटाचे आऊटडोअर शूटिंग पूर्ण झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, आता त्यांचे शेवटचे शेड्यूल जानेवारीमध्ये सुरू होईल. अभिनेता अनिल कपूर दिव्या खोसला कुमारसोबत ‘सावी: अ ब्लडी हाउसवाइफ’ या चित्रपटात दिसले होते. आणि आता अभिनेता लवकरच ‘सुभेदार’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.