Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्जरीनंतर दीपिका कक्करने मुलगा रुहानसोबत घालवला वेळ, कठीण काळ आठवून झाली भावुक!

अभिनेत्री दीपिका कक्कर हिला यकृताच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्री घरी परतली आहे आणि ती मुलगा रुहानसोबत वेळ घालवत आहे. याची एक झलक शोएब इब्राहिमने एका व्लॉगमध्ये दाखवली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 16, 2025 | 02:27 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर हिच्या यकृताची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सुमारे एक आठवडा रुग्णालयात राहिल्यानंतर, अभिनेत्री अखेर घरी परतली आहे. शोएब इब्राहिम तिच्या प्रकृतीबद्दल सतत चाहत्यांना अपडेट देत आहे. व्हीलॉगद्वारे शोएबने सांगितले होते की गेल्या काही काळ त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप कठीण होता. सध्या, अभिनेत्री पूर्वीपेक्षा खूपच बरी आहे आणि तिचा मुलगा रुहानसोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. शोएब इब्राहिम देखील तिच्यासोबत आहे आणि त्याने व्हीलॉगद्वारे एक झलक दाखवली आहे.

पोलो क्लबमधून संजय कपूर यांचा समोर आला शेवटचा फोटो, टीमने वाहिली भावनिक श्रद्धांजली

शोएब त्याच्या मुलासाठी खेळणी खरेदी करताना दिसला
शोएब इब्राहिमने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्हीलॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये दीपिका कक्कर रुग्णालयातून घरी आल्यानंतर मुलगा रुहानसोबत वेळ घालवताना आणि खेळताना दिसत आहे. फादर्स डे निमित्त शोएबने त्याच्या दोन वर्षांचा मुलगा रुहानसाठी नवीन खेळणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्याने त्याच्या मुलासाठी एक नवीन स्कूटर खरेदी केली. व्हीलॉगमध्ये, तुम्ही पाहू शकता की दीपिका कक्कर खूप आनंदी आहे आणि ती पती शोएबसोबत आणि मुलासोबत वे; घालवताना दिसत आहे.

 

मुलगा रुहानने त्याच्या वडिलांना संदेश दिला
दीपिका कक्करने दाखवले की मुलगा रुहानसाठी स्कूटर खरेदी केल्यानंतर, शोएब इब्राहिम बहीण सबाच्या नवजात बाळ हैदरसाठी देखील खेळणी खरेदी करतो. यादरम्यान, दीपिका तिच्या पतीची प्रशंसा करते आणि कॅमेऱ्यासमोर शोएबने त्याच्या मुलासाठी आणलेली सर्व खेळणी दाखवते. फादर्स डे निमित्त, रुहानने त्याच्या वडिलांना एक खास संदेश देखील दिला, जो दीपिकाने दाखवला. खरं तर, अभिनेत्रीने काठीवर हॅपी फादर्स डे लिहून रुहानला दिला.

‘दहशतवादी मुस्लिम असतात…’, पहलगाम हल्ल्यावर आमिर खानचे मोठे विधान, मौन बाळगण्याचे सांगितले कारण

शोएबला कठीण काळ आठवला
व्हलॉगच्या शेवटी, शोएब इब्राहिमला दीपिका कक्करची तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले तेव्हाचा वाईट काळाची आठवण झाली. अभिनेत्याने घरी आनंद आणि हास्य परत आणल्याबद्दल अल्लाहचे आभार मानले. शोएबने सांगितले की, दीपिकाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. जेव्हा अभिनेत्रीला खाजगी वॉर्डमध्ये हलवण्यात आले तेव्हा त्याने दीपिकाला आनंदी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. तो तिला विनोद देखील सांगायचा. आता या सगळ्यांना एकत्र बघून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

Web Title: Dipika kakar spends quality time with son ruhaan after discharge hospital shoaib ibrahim share vlog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 02:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.