(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये सुमारे २६ लोक मारले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पीडितांना त्यांचा धर्म विचारून मारले. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले, त्यापैकी एक म्हणजे आमिर खान. अभिनेता पहलगामबद्दल किंवा ऑपरेशन सिंदूरबद्दल थेट काहीही बोलला नाही. तथापि, आता त्याने याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अभिनेता आमिर खान याबद्दल काय म्हणाला जाणून घेऊयात.
दहशतवादी हल्ला भ्याड असल्याचे सांगितले
अलीकडील मुलाखतीत आमिर खानने दहशतवादी हल्ला क्रूर आणि भ्याड असल्याचे वर्णन केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “दहशतवादी हल्ला क्रूर होता. यावरून दहशतवाद्यांची भ्याडपणा दिसून येतो की त्यांनी आपल्या देशात घुसून सामान्य लोकांवर गोळीबार केला. तुम्ही किंवा मीही तिथे असू शकतो. त्यांनी त्यांचा धर्म विचारला आणि नंतर गोळीबार केला. याचा अर्थ काय?” असे अभिनेत्याने म्हटले.
‘Housefull 5’ चा आठवड्याच्या शेवटी मोठा धमाका, चित्रपटाने १५० कोटींचा आकडा केला पार!
अभिनेत्याने मांडले आपले मत
अभिनेत्याने पुढे स्पष्ट केले की त्याने यावर आधी प्रतिक्रिया का दिली नाही. अभिनेत्याच्या मते, “मी सोशल मीडियावर नाही. लोक या घटनांवर लगेच प्रतिक्रिया देतात. हा केवळ आपल्या देशावरच नाही तर आपल्या एकतेवरही हल्ला होता. त्यांना आपल्या देशाकडून आधीच योग्य उत्तर मिळाले आहे.” असे अभिनेत्याने सांगितले.
आमिर दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही
आमिर खान पुढे म्हणाला की त्याने या दहशतवादी हल्ल्यामुळे ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर रद्द केला होता. त्याने ‘अंदाज अपना अपना’चा प्रीमियर देखील रद्द केला होता. पुढे, धर्मा विचारल्यानंतर मारल्याबद्दल अभिनेता म्हणाला, “कोणताही धर्म तुम्हाला लोकांना मारण्यास सांगत नाही. मी या दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही कारण इस्लाममध्ये असे लिहिले आहे की तुम्ही कोणत्याही निष्पाप व्यक्तीला मारू शकत नाही, तुम्ही कोणत्याही महिलेवर किंवा मुलावर हल्ला करू शकत नाही. ते जे करत आहेत ते करून ते धर्माच्या विरोधात जात आहेत.” असे अभिनेत्याने या मुलाखतीत म्हटले.
आमिर खानने असेही म्हटले की, दहशतवादी हल्ल्याचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाला. तो इतका दुःखी होता की त्याने अनेक दिवस घराबाहेरही पाऊल ठेवले नाही. तसेच अभिनेता म्हणाला की तो त्याच्या चित्रपटांमधून त्याची देशभक्ती व्यक्त करतो.