
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या बॉर्डर २ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सुनील शेट्टी नेहमी महाराष्ट्राबद्दल त्याचं प्रेम दाखवतो. अशातच त्याने भाषा सक्ती आणि मराठी भाषेबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.
यामुळे भाषेच्या वादाला पुन्हा एकदा वेग आला आहे. महाराष्ट्र सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी सक्तीची केली. या निर्णयाच्या बाजूने आणि विरोधात लोक प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता सुनील शेट्टी देखील हिंदी – मराठी वादात सामील झाला आहे.
सुनील शेट्टी मराठी बोलण्यासाठी कोणावरही दबाव आणण्याचा तीव्र विरोध करतो. ANI ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सुनील शेट्टीने भाषेच्या मुद्दयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तो म्हणाला, ” मी खूप लहान असताना माझ्या गावतून मंगळुरू इथे आलो. मी संधी शोधण्यासाठी इथे आलो होतो, माझी ओळख बदलण्यासाठी नाही. आपली भौगोलिक परिस्थिती बदलली तरी मूळ ओळख बदलत नाही. माझ्या प्रत्येक कामात तुम्हाला मंगळुरूची झलक दिसेल.”
जेव्हा त्याला मराठीबद्दल विचारले, ” जेव्हा कोणी मला विचारतं की मराठीचं काय? तेव्हा मी म्हणतो, मराठीचं काय? “मला भाषा बोलण्यासाठी दबाव आणू नका. मी ती भाषा तेव्हाच बोलेन जेव्हा माझी इच्छा असेल. मला भाषा बोलण्यासाठी भाग पाडू नका.”
प्रिया कपूरने ३०,००० कोटी रुपयांची मालमत्ता केली हडप? Rani Kapur चा आरोप, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल
पुढे सुनील शेट्टीने स्पष्ट केले की, त्याचा विरोध भाषेला नसून ती लादण्याला आहे. मुंबई ही आपली कर्मभूमि असल्याचे मान्य करत तो म्हणाला, “जर ही माझी कर्मभूमि आहे, जर मी ही भाषा शिकलो तर मी अनेक लोक आनंदी होतील.” हे मला माहित आहे. पुढे त्याने आत्मविश्वासाने सांगितले,” मुंबईत राहणारी आजची अनेक महाराष्ट्रीयन मुले जितकी चांगली मराठी बोलत नसतील, त्यापेक्षाही चांगली मराठी मी बोलतो.”अशा प्रकारे सुनील शेट्टीने आपलं मत व्यक्त केलं आहे.