
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हर्षवर्धनच्या “सनम तेरी कसम” या चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनानंतर, आणखी एक रोमँटिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. “एक दीवाने की दिवानियत” हा चित्रपट इतका चांगला प्रतिसाद देत आहे की “थामा” सारख्या मोठ्या चित्रपटाच्या तोंडावरही, चित्रपटाने त्याचा पहिला वीकेंड संपण्यापूर्वीच त्याचे संपूर्ण बजेट वसूल केले आहे.
या चित्रपटाने केवळ त्याचे बजेट वसूल केले नाही तर आता त्याने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे आणि लवकरच हा चित्रपट ब्लॉकबस्टर बनण्याच्या तयारीत आहे. रविवारच्या सुट्टीमुळे चित्रपटाच्या कमाईतही वाढ झाली आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांना देखील आवडत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे जाणून घेऊयात.
‘ते सगळं काही घडलं…’, ट्रेनमध्ये Raveena Tandon सोबत झाली होती छेडछाड,घटना आठवताच थरथरते अभिनेत्री
“एक दीवाने की दिवानियत”चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
चित्रपटाच्या दैनंदिन कमाईचा संपूर्ण डेटा आपण आता जाणून घेणार आहोत. कृपया लक्षात घ्या की SACNILC च्या माहितीनुसार, आता पर्यंतच्या कमाईत बद्दल होण्याची शक्यता आहे. तसेच हा चित्रपट पुढे किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शन आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ९ कोटी रुपये, तर दुसऱ्या दिवशी ७.७५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ६ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ५.५ कोटी, पाचव्या दिवशी ५.७५ कोटी रुपये आणि सहाव्या दिवशी ६.४४ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण ४०.९४ कोटींची कमाई केली आहे.
‘एक दीवाने की दिवानियत’ ‘सनम तेरी कसम री-रिलीज’ चा मोडेल रेकॉर्ड
हर्षवर्धन राणे यांच्या टॉप तीन कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘सनम तेरी कसम री-रिलीज’चा समावेश आहे. ‘एक दीवाने की दिवानीयत’ यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यापासून फक्त काही कोटी दूर आहे. हा चित्रपट कधी पहिल्या क्रमांकावर पोहोचेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
‘१२० बहादूर’चा देशभक्तीपर गाण्याचा लखनऊमध्ये भव्य लाँच, फरहान-अख्तर आणि सुखविंदर सिंग एकत्र!
हर्षवर्धन राणे यांच्या टॉप तीन कमाई करणारे चित्रपट
सनम तेरी कसम री-रिलीज – ₹४२.२८ कोटी
एक दीवाने की दिवानियत – ₹४०.९४ कोटी (कमाई सुरु)’
सावी: अ ब्लडी हाऊसवाइफ – ₹७.८४ कोटी
‘एक दिवाने की दिवानियत’ चे बजेट आणि स्टारकास्ट
या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे. कोइमोई यांच्या मते, चित्रपटाचे बजेट सुमारे ₹२५ कोटी आहे. प्रमोशनवर जास्त खर्च झालेला नाही, परंतु सकारात्मक पुनरावलोकने आणि तोंडी प्रमोशन केल्यामुळे, सोनम बाजवा आणि हर्षवर्धन स्टारर हा चित्रपट अवघ्या पाच दिवसांत जगभरात धुमाकूळ घालत आहे.