Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चा दमदार टिकाव!

सध्या सिनेमागृहात सर्वत्र ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची चर्चा सुरु असताना दिसत आहे. अशातच आता चित्रपट हिंदी चित्रपटांना दमदार टक्कर करताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 28, 2026 | 02:58 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत ‘अगं अगं सूनबाई!’ सुस्साट
  • ‘अगं अगं सूनबाई!’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस
  • ‘अगं अगं सूनबाई!’ चित्रपटाची कमाई
 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला चित्रपटगृहात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक शहरांमध्ये आणि उपनगरांमध्ये शोज हाऊसफुल्ल सुरू आहेत. मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही हा मराठी चित्रपट आपली मजबूत स्थान टिकवून आहे.

सध्या विविध ठिकाणी झालेल्या थिएटर व्हिजिट्सदरम्यान कलाकार आणि टीमला मिळालेला प्रतिसाद विशेष उल्लेखनीय ठरत आहे. अनेक प्रेक्षक फक्त शीर्षक पाहून हलका-फुलका, मजेशीर चित्रपट पाहाण्याची अपेक्षा घेऊन गेले होते. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर हास्याबरोबरच नकळत डोळ्यांत पाणी आणणारे भावनिक क्षण त्यांच्या हृदयाला स्पर्श प्रत्येक डोळ्यांत पाणी आणत आहेत. शो संपल्यानंतर प्रेक्षकांकडून येणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया इतर प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. चित्रपटातील सासू-सूनच्या नात्यातील प्रसंग, संवाद प्रेक्षकांना हसवतानाच भावनिकही करत आहेत. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट आपलासा वाटत असून निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक करत आहेत. तसेच प्रेक्षक या चित्रपटासाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचे आभार मानत आहेत.

एक नाही, दोन अवतार! नील भट्टची ‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये दमदार एन्ट्री, मालिकेबाबत व्यक्त केला खास अनुभव

चित्रपटाबद्दलची आणखी विशेष गोष्ट अशी की, काही महिलांनी या चित्रपटाची तिकिटे हळदीकुंकूवाचे वाण म्हणून दिली आहेत. चित्रपटाबरोबरच चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्यांवर सोशल मीडियावर रील्स शेअर केले जात आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचत असून यामुळे त्यांची नाती अजून घट्ट होत आहेत.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “आज हिंदी मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेत मराठी चित्रपट चित्रपटगृहात आपली जागा टिकवत आहेत, याचा खूप अभिमान वाटतो. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ला प्रेक्षकांनी जे प्रेम दिले आहे, ते संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी आहे. घराघरांत दिसणाऱ्या सासू-सुनेच्या नात्यांची गंमत, भावना आणि ताकद या चित्रपटात आहे, म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाशी जोडला जात आहे.”

अजित पवारांचे चित्रपटसृष्टीशी होतं विशेष नातं, मुलाला टीव्हीवर पाहण्याची वडिलांची इच्छा; दादांनी का निवडला राजकारणाचा मार्ग?

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, सना शिंदे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे.

Web Title: Aga aga sunbai kay mhantay sasubai marathi movie are giving tough competition to hindi films in the cinemas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

अरिजीत सिंगच्या निवृत्तीदरम्यान, झाकीर खानचे नवीन विधान व्हायरल; स्टँड-अपमधून ब्रेक घेण्याचे खरे कारण उघड
1

अरिजीत सिंगच्या निवृत्तीदरम्यान, झाकीर खानचे नवीन विधान व्हायरल; स्टँड-अपमधून ब्रेक घेण्याचे खरे कारण उघड

अभिनेता KRK ला गोळीबार प्रकरणात अटक; मुंबई न्यायालयाने जामीन नाकारला, वडिलांचा धक्कादायक दावा
2

अभिनेता KRK ला गोळीबार प्रकरणात अटक; मुंबई न्यायालयाने जामीन नाकारला, वडिलांचा धक्कादायक दावा

Box Office: ‘बॉर्डर २’ ला मोठा झटका! पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाई ६५% पेक्षा जास्त घसरण; केला एवढाच गल्ला!
3

Box Office: ‘बॉर्डर २’ ला मोठा झटका! पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाई ६५% पेक्षा जास्त घसरण; केला एवढाच गल्ला!

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!
4

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.