(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा बहुप्रतिक्षित ‘इमर्जन्सी’ चित्रपट अखेर सेन्सॉर बोर्डाने मंजूर केला आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून वादात अडकला होता. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात 1975 मध्ये लागू करण्यात आलेली ‘आणीबाणी’ दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटाला क्लीन चिट मिळाल्यानंतर अभिनेत्रीने ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया हँडल X वर लिहिले की, ‘आम्हाला कळवताना खूप आनंद होत आहे की ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले आहे. आम्ही लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहोत. तुमच्या संयम आणि पाठिंब्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन.” असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादात अडकला होता. अकाली दलाने या चित्रपटावर आक्षेप घेतला होता आणि चित्रपटात शीख समुदायाला चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोपही केला होता. इतकेच नाही तर काँग्रेसचे काही नेतेही या चित्रपटाला कडाडून विरोध करत होते. ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबाबत अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. अभिनेत्री कंगना रणौतने एका व्हिडिओद्वारे सांगितले होते. या वादांमुळे हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केला नाही, त्यामुळे ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 6 सप्टेंबरला रिलीज होऊ शकला नाही.
We are glad to announce we have received the censor certificate for our movie Emergency, we will be announcing the release date soon. Thank you for your patience and support 🇮🇳
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 17, 2024
हे देखील वाचा – ‘तुझी अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल’; बिश्नोई गँगची सलमानला पुन्हा धमकी, 5 कोटीची ऑफर
‘इमर्जन्सी’साठी कंगना रणौतने ठोठावला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केला नाही तेव्हा अभिनेत्रीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कंगना रणौतचा चित्रपट लवकरात लवकर पास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले होते. अभिनेत्रीने स्वतः एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे. आणि आता खूप प्रतिक्षेनंतर हा चित्रपट चित्रपगृहात दाखल होणार आहे.