Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर झाला रिलीज, ६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल!

नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा 'श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन' हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन आणि नवीन अनुभव घेता येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकारांची झलक तुम्हला पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 20, 2024 | 11:06 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी माणूस म्हटल की तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी हजारोंच्या घरात अर्ज येतात हे समाजातील भयान वास्तव आहे. त्यातच नोकरभरातीतील भ्रष्टाचार आणि पेपरफूटी प्रकरण तर नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या प्रवासातील मोठे अडथळे ठरत आहेत. याच गंभीर विषयाला वाचा फोडणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे.

उत्तेजना स्टूडिओज प्रा. लि. निर्मित ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटात जनक सिंह आणि समीर रंधवे हे दोघे झुंजारू उद्योजक आहेत. त्यांच्या कॅफे च्या शाखा विस्तारण्यासाठी ते एका गुंतवणूकदाराच्या शोधत असतात. जनकच्या सभ्य व्यक्तिमत्वामध्ये आणखी एक पैलू दडलेला आहे, तो रात्रीच्या अंधारात ए. के. नावाच्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे. त्याला पकडायला जनक सिंह कुठल्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे. तर कोण आहे ए. के ? जनक त्याला का शोधतोय? आणि त्यांचा काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे.

 

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अजिंक्य उपासनी म्हणाले, ‘आम्ही मराठी माणसांसाठी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी माणसे दिवाळी, ख्रिसमस अशा वेळेस हिंदी किंवा अन्य चित्रपट बघत असतात. यंदा आम्ही खास मराठी प्रेक्षकांसाठी गणेशोत्सवात मराठी चित्रपट घेऊन येत आहोत.’ मराठी माणसांनी मराठी सण – उत्सवाला मराठी चित्रपट पहावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हे देखील वाचा- ‘मी जिवंत आहे’, मृत्यूच्या अफवेने त्रस्त श्रेयस तळपदे सोशल मीडियावर झाला व्यक्त, म्हणाला, माझी मुलगी…

डॉ. पार्थसारथी आणि सौ. प्रेरणा उपासनी यांनी ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अभिनेता गौरव उपासनी, अथर्व देशपांडे, वैभव रंधवे, सायली वैद्य, संपदा गायकवाड आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन, छायांकन, संकलन, पटकथा अशी तिहेरी जबाबदारी अजिंक्य उपासनी यांनी लीलया पेलली आहे. चित्रपटाची कथा गौरव उपासनी यांची असून या चित्रपटासाठी संवाद लेखनही त्यांनी केले आहे. तर या चित्रपटाला संगीत व पार्श्वसंगीत सुमेध मिरजी यांचे लाभले आहे. या चित्रपटाचे वितरण रूपम एंटरटेनमेंट करत आहेत. नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा सस्पेन्स थ्रीलर ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Exciting trailer of the movie sriyut non maharashtrian released the movie will be released in theatres on 6th september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 11:06 AM

Topics:  

  • Entertainment News

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

Lock Upp Season 2: धक्कादायक! गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाच्या घटस्फोटाचा खुलासा, 1 वर्षापासून राहतात वेगळे
4

Lock Upp Season 2: धक्कादायक! गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाच्या घटस्फोटाचा खुलासा, 1 वर्षापासून राहतात वेगळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.