(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमध्ये स्टाईल, फिटनेस आणि डान्सचा विचार केला तर हृतिक रोशनचे नाव नेहमीच घेतले जाते. पण यावेळी त्याची आई पिंकी रोशन यांच्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी असा डान्स केला की त्या आता सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. हृतिक रोशनच्या आगामी ‘वॉर २’ चित्रपटातील ‘आवान जवान’ या नवीन गाण्यावरील त्यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि बॉलीवूडपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण त्यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ
हृतिकने स्वतःच सोशल मीडियावर आईचा डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पिंकी रोशन या पूर्ण उत्साहाने गाण्याचे हुक स्टेप करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत हृतिकने लिहिले आहे की जेव्हा आई संपूर्ण दिवस गाण्याचे स्टेप्स शिकण्यात घालवते आणि तेही खूप छान शैलीत, तेव्हा समजून घ्या की ते गाणे हिट झाले आहे. व्हिडिओसह त्याचा प्रेमळ संदेश आणि रेड हार्ट इमोजीने हा क्षण अधिक खास बनवला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी कंमेंट करून चांगला प्रतिसाद दिला आहे.
Shanawas Death: प्रसिद्ध मल्याळम अभिनेते शानवास यांचे निधन; वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रियांका, कियारा आणि सुझानने प्रतिक्रिया दिली
व्हिडिओवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. हृतिकची एक्स पत्नी सुझान खानने कमेंट केली, ‘खूप गोंडस!’ तर प्रियांका चोप्राने पिंकी रोशनचे कौतुक केले आणि लिहिले, ‘तू सर्वोत्तम आहेस.’ गाण्यात हृतिकसोबत दिसलेली अभिनेत्री कियारा अडवाणीनेही हार्ट इमोजीद्वारे तिचे प्रेम व्यक्त केले. व्हिडिओला कलाकारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि या गाण्यात पिंकी रोशन या खूप उत्साहाने डान्स स्टेप करताना दिसत आहेत.
पिंकी रोशन यांनीही व्हिडिओ केला शेअर
पिंकी रोशन यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की हा तिचा सरावाचा पहिला दिवस होता आणि तिला या गाण्याचे धून इतके आवडले की ती स्वतःला नाचण्यापासून रोखू शकली नाही. तिने कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस आणि ट्रेनर गुलनाज यांचेही आभार मानले. तिचे पती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनीही या व्हिडिओवर कमेंट केली आणि लिहिले की, ‘खूप छान… आता माझी वेळ लवकरच येईल.’ असे लिहून त्यांनी देखील व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे.
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेल्या शहनाज गिलची करण वीरने घेतली भेट, व्हिडिओ शेअर करत केली प्रार्थना
‘आवां जवान’ या गाण्याबद्दल
‘आवां जवान’ हे गाणं ३१ जुलै रोजी कियारा अडवाणीच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे अरिजीत सिंग आणि निकिता गांधी यांनी गायले आहे, संगीत प्रीतम यांनी दिले आहे आणि गीत अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली आहेत. व्हिडिओमध्ये हृतिक आणि कियारा इटलीच्या सुंदर ठिकाणी रोमान्स करताना दिसत आहेत.
‘वॉर २’ कधी होणार प्रदर्शित?
‘वॉर २’ मध्ये, हृतिक पुन्हा एकदा त्याच्या सुपर स्पाय पात्र कबीरच्या भूमिकेत परतत आहे. यावेळी तो दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरशी सामना करणार आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे ज्यामध्ये सलमानचा ‘टायगर’ आणि शाहरुखचा ‘पठाण’ देखील समाविष्ट आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.