(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या सतत चर्चेत आहे. नुकतेच गोविंदाच्या पायाला बंदुकीची गोळी लागली होती. त्यानंतर गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोविंदाची गोळी काढण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर गोविंदा आता घराकडे रवाना झाला आहे. काही वेळापूर्वीच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा कुटुंबीयांसह त्याला घेण्यासाठी आली होती. सध्या गोविंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोविंदा डिस्चार्ज झाल्यानंतर त्याच्या घरी जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गोविंदा व्हीलचेअरवर बसलेला दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळावा यासाठी त्याची पत्नी सुनीता आहुजा रुग्णालयात पोहोचली आहे. नवरात्रीमध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत असल्याबद्दल सुनीताने आनंद व्यक्त केला आहे. सुनीता आहुजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणताना दिसत आहे, ‘ गोविंदा वाचले, यापेक्षा मोठा आनंद कोणता? आणि नवरात्रीच्या मुहूर्तावर आम्ही त्यांना घरी घेऊन जात आहोत यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. सर्वांचा आशीर्वाद आहे, माता राणीचा आशीर्वाद आहे. सर्वत्र पूजा-अर्चा सुरू होती. सर्वांच्या प्रार्थनेने सर एकदम बरे आहेत आणि लवकरच कामाला देखील ते सुरुवात करणार आहेत. ” असे त्या म्हणताना दिसल्या.
#WATCH | Mumbai: Actor and Shiv Sena leader Govinda discharged from CritiCare Asia in Mumbai.
He was admitted here after he was accidentally shot in the leg by his own revolver. pic.twitter.com/XU1Tidt7hu
— ANI (@ANI) October 4, 2024
हे देखील वाचा- राशी खन्ना, विक्रांत मॅसी ‘द साबरमती रिपोर्ट’च्या प्रमोशनला सुरुवात करण्यासाठी नवरात्री उत्सवात पोहचले!
हॉस्पिटलमधून बाहेर येताच गोविंदाने सर्वप्रथम मीडियासमोर हात जोडले. गोविंदा हॉस्पिटलमधून बाहेर येताच मीडियाने त्याला चारही बाजूंनी घेरले. यावेळी गोविंदा काळ्या शर्टमध्ये दिसला. आता गोविंदाचे हसणे पाहून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गोविंदाची गोळी लागल्याची बातमी ऐकून त्याचे चाहते चांगलेच घाबरले होते. लोक मंदिरांमध्ये गोविंदाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत होते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता अभिनेत्याला चांगल्या अवस्थेत पाहून चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे.