(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी त्यांच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. आणि म्हणून अभिनेत्रीने नवरात्री उत्सवात विक्रांतसोबत सहभागी होऊन चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. देवीच्या आशर्वादाने त्यांनी प्रमोशनला जोरदार सुरुवात केली आहे. संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात राशी एका रिपोर्टरची भूमिका करताना दिसणार आहे. हा चित्रपट साबरमती एक्स्प्रेस घटनेमागील सत्य उघड करण्याच्या मोहिमेवर आधारित आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या तीव्रतेची झलक देऊन एका प्रभावी पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा नवा अनुभव आणि नवे पात्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज
चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे नवं पोस्टर पोस्ट केले आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ज्वलंत सत्य 15 नोव्हेंबरला समोर येईल! सोबत रहा! ‘द साबरमती रिपोर्ट’ फक्त सिनेमागृहात!” असे लिहून चित्रपटाच्या नव्या आणि पहिल्या पोस्टर झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित हे गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ २७ फेब्रुवारी २००२ रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेचे तपशीलवार आधारित असून याआधी रिलीज झालेल्या ट्रेलरने राशी आणि विक्रांत भूमिका कशी प्रभावी असणार आहे याची एक झलक दिली होती.
हे देखील वाचा- बिग बॉसच्या घरातून थेट रुपेरी पडद्यावर, छोट्या पुढारीला मिळाला हा चित्रपट!
‘द साबरमती रिपोर्ट’ च्या रिलीजच्या पलीकडे राशी खन्ना पुढील चित्रपट ‘तलाखों में एक’ मध्ये पुन्हा विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याची तयारी करत आहे जो लवकरच रिलीज होणार आहे. तिच्याकडे ‘तेलुसू काडा’ नावाचा तेलगू चित्रपट देखील आहे. जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच, विक्रांत मॅसी ‘१२ फेल’ या चित्रपटाच्या यशानंतर नुकताच ‘सेक्टर 36’ या वेब सिरीजमध्ये झळकला. आणि आता अभिनेता आणखी नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.