
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता गोविंदा काल रात्री त्याच्या घरी बेशुद्ध पडला आणि त्याला मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्याचे मित्र ललित बिंदल यांनी सांगितले. तर आता अभिनेता गोविंदाच्या चाहत्यांसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि तो बरा आहे. गोविंदाने स्वतः त्याला काय झाले आणि तो आता त्याची तब्येत कशी आहे या बदल अपडेट दिली आहे.
माध्यमांशी बोलताना गोविंदा म्हणाला, मी ठीक आहे…तुम्हा सगळ्यांचा मी आभारी आहे”, असं म्हणत गोविंदाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर गोविंदाने मीडियाशी संवाद साधला. “मी खूप व्यायाम केल्याने मला चक्कर आली.योगा-प्राणायम चांगलं आहे. पण, खूप व्यायाम कठीण गोष्ट आहे. मी माझी पर्सनालिटी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी मला औषधं दिली आहेत”
Shahrukh Khanचा डबल धमाका! ६ ब्लॉकबस्टर चित्रपट OTTवर ट्रेंडिंग, कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले
#WATCH | Mumbai, Maharashtra: As actor Govinda leaves from a hospital after getting discharged, he says, “I did excessive hard work and was fatigued. Yoga-Pranayam is good. Excessive exercise is tough. I am trying to make my personality even better. I feel Yoga-Pranayam is… pic.twitter.com/Yexw1SHJur — ANI (@ANI) November 12, 2025
मनमिळाऊ हर्षदा खानविलकरचा सामाजिक संकल्प, शिक्षणासाठी हात पुढे करून दिली खरी ‘आईपणाची’ ओळख!
दरम्यान, गोविंदाचे जवळच्या मित्राने माध्यमांना सांगितले की, अभिनेत्याला न्यूरोलॉजिस्टला भेटण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याला खूप डोकेदुखी होती. डॉक्टरांनी अनेक चाचण्या केल्या आणि त्याला सतत निरीक्षणाखाली ठेवले. मित्र ललित बिंदल यांनी खुलासा केला की, गोविंदा त्या रात्री बेशुद्ध झाला तेव्हा सुनीता आणि मुलगी टीना घरी नव्हत्या. सुनीता एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून निघाली होती, तर टीना आहुजा चंदीगडमध्ये होती. टीना संध्याकाळपर्यंत परत येईल, पण सुनीता परतली आहे.