(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गायक गुरु रंधावा सध्या वादात अडकला आहे. शाळकरी मुलींवर चित्रित केलेल्या ‘अजुल’ या गाण्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. या गाण्यात शाळकरी मुलींची प्रतिमा खराब केल्याचा आरोप गुरु रंधावावर करण्यात आला आहे. हे प्रकरण अजून थंडावले नव्हते की आता गायकाच्या अडचणी पुन्हा वाढताना दिसत आहेत. लोकांनी त्यांच्या नवीनतम गाणं ‘सिर्रा’ विरोधातही निषेध केला आहे आणि या प्रकरणात, लुधियाना न्यायालयाने त्यांना समन्सही जारी केले आहेत. लुधियाना जिल्ह्यातील समराला येथील रहिवासी राजदीप सिंग मान यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर हे समन्स जारी करण्यात आले आहे. तक्रारदार राजदीप सिंग यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की गुरु यांच्या नवीनतम गाण्याचे बोल ‘सिर्रा’ अपमानजनक आहेत आणि ड्रग्जच्या वापरावर भर देणारे आहेत.
‘Lokah: Chapter 1’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, पहिल्या दिवसाची २.५ कोटींचा गल्ला पार
लुधियानातील एका व्यक्तीचा गुरु रंधावाच्या गाण्यावर आक्षेप
त्यांच्या तक्रारीत, राजदीप सिंग यांनी गुरु रंधावाच्या गाण्याच्या एका विशिष्ट ओळीवर आक्षेप घेतला आहे. गाण्यात एक ओळ आहे ‘ओ जट्टा दे आ काके बलिये… जमेया नु गुरती चा मिली अफीम है…’ ज्याचा अर्थ ‘आम्ही जाटांचे पुत्र आहोत. जन्माच्या वेळी आम्हाला पहिल्या डोसमध्ये अफू मिळाला.’
गुरु रंधावा यांना न्यायालयाने समन्स बजावले
तक्रारदाराचे वकील गुरबीर सिंग ढिल्लन यांनी गाण्याचे बोल “आक्षेपार्ह” म्हटले आणि गुरु रंधावाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. “आम्ही रंधावाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करतो. हे बोल पवित्र शीख परंपरेचा अपमान करतात. गुर्ती देण्याची प्रथा खूप भावनिक आहे आणि आदर आणि पावित्र्याशी संबंधित आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गाण्यातून दिसून येते की जाट कुटुंबांमध्ये नवजात बालकांना अफू दिली जाते, जे अस्वीकार्य आहे,” असे वकिलाने म्हटले आहे.
न्यायालयाने आता गुरु रंधावा यांना ‘व्यक्तिगतपणे किंवा वकिलांमार्फत’ हजर राहण्यास सांगितले आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम २२३ अंतर्गत हे समन्स जारी करण्यात आले आहे. गुरु रंधावा व्यतिरिक्त, तक्रारीत ॲपल म्युझिक, यूट्यूब, अमेझॉन म्युझिक, इन्स्टाग्राम, स्पॉटीफाय इंडिया, वॉर्नर म्युझिक इंडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा उल्लेख आहे जे हे गाणे होस्ट करत आहेत.