फोटो सौजन्य - Social Media
जान्हवी आणि सिद्धार्थचा रोमँटिक चित्रपट ‘परम सुंदरी’ बऱ्याच प्रतीक्षेनंतर २९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर वापरकर्ते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रेक्षकांना दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूप आवडत आहे. तसेच हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
प्रेक्षकांनी दिल्या प्रतिक्रिया
जान्हवी आणि सिद्धार्थचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘परम सुंदरी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होताच वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले की हा ‘चेन्नई एक्सप्रेस’ची कॉपी नाही तर पूर्णपणे वेगळ्या कथेचा चित्रपट आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, जान्हवी-सिद्धार्थची ऑनस्क्रीन केमिस्ट्री उत्तम आहे. त्याच वेळी, एका वापरकर्त्याने म्हटले की हा एक अतिशय मनोरंजक चित्रपट आहे. याशिवाय इतर वापरकर्त्यांनी या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट म्हटले आहे.
#ParamSundarIReview ~ SUPER ENTERTAINER ✅🎬
Rating: ⭐️⭐️⭐️⭐️
Honestly, #ParamSundari has to be the most ENTERTAINING FILM of 2025 till now. It’s got everything—COMEDY, ROMANCE, EMOTIONS and some really amazing MUSIC🔥
The CHEMISTRY between @SidMalhotra & #JanhviKapoor pic.twitter.com/14SAvr5tT5
— Satyam Maurya🧢 (@Satyam0001m) August 29, 2025
परम सुंदरी चित्रपटाबद्दल
‘परम सुंदरी’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा उत्तर भारतातील परम नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. जान्हवी कपूरने दक्षिण भारतातील सुंदरी नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. या दोघांमध्ये प्रेम कसे फुलते हे या चित्रपटाच्या कथेमध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तुषार जलोटा यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच या चित्रपटामध्ये उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
‘Lokah: Chapter 1’ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, पहिल्या दिवसाची २.५ कोटींचा गल्ला पार
‘चेन्नई एक्सप्रेस’ची कॉपी आहे ‘परम सुंदरी’?
‘परम सुंदरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा हा ट्रेलर पाहताच अनेक यूजर्सने म्हटले की हा चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’ सारखा आहे. त्याचा ट्रेलर आणि चित्रपटामधील काही दृश्य ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटासारखी दिसली. परंतु ‘परम सुंदरी’ चित्रपट आज रिलीज झाला आहे. आणि तो ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटासारखा नाही तर पूर्णपणे वेगळा असल्याचे म्हटले आहे.