(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
२०२४ मध्ये, तेजा सज्जाने ‘हनुमान’ चित्रपटाद्वारे खूप लक्ष वेधले. या कमी बजेटच्या चित्रपटाने दक्षिणेकडून हिंदीपर्यंत बरीच कमाई केली. तेजा आता या वर्षी ‘मिराई’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास सज्ज आहे. संपूर्ण भारतात स्टार बनलेल्या तेजा सज्जाच्या या चित्रपटाची रिलीज डेट आज शनिवारी जाहीर करण्यात आली आहे.या बातमीने चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. तसेच अभिनेत्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
कधी प्रदर्शित होणार चित्रपट
‘मिराई’ हा चित्रपट या वर्षी ऑगस्टमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट ०१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. तेजा सज्जाने आज चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना ही माहिती शेअर केली आहे. आणि चाहत्यांना खुश करून टाकले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मिराई’ हा चित्रपट कार्तिक घट्टामनेनी दिग्दर्शित करत आहेत. जो पाहण्यासाठी चाहते आता खूप उत्सुक आहेत.
फराह खानच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊकडून तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय ?
चित्रपटात हे स्टार्स दिसणार
‘हनु-मान’ चित्रपटाने तेजा सज्जाला संपूर्ण भारतात स्टार बनवले आहे. प्रेक्षकही त्याच्या ‘मिराई’ चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा एक अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. कार्तिक घट्टामनेनी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती टीजी विश्व प्रसाद आणि कृती प्रसाद करत आहेत. या चित्रपटात तेजा सज्जा व्यतिरिक्त मनोज मंचू आणि रितिका नायक देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
तेजा सज्जाचा हा चित्रपट आठ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हे तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, मराठी आणि चिनी भाषांमध्ये प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे. ‘हनुमान’ चित्रपटात तेजाच्या जादूने प्रेक्षकांवर चमत्कार केला, त्यामुळे या चित्रपटाकडूनही मोठ्या संख्येने प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. तसेच हा चित्रपट आता लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.