Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंगल, संघर्ष आणि नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी सांगणाऱ्या ‘अरण्य’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंंच, गडचिरोलीच्या जंगलात झालंय शूटिंग

अभिनेता हार्दिक जोशीची प्रमुख भूमिका असलेला अरण्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

  • By अमृता यादव
Updated On: Sep 12, 2025 | 07:32 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेता हार्दिक जोशीची चित्रपटात प्रमुख भूमिका
  • जंगलात जगणाऱ्या सामान्य माणसाची गोष्ट
  • लक्षात राहणारा सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट

 

सत्य घटनांनी प्रेरित ‘अरण्य’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. संघर्षमय जीवनाची झुंज, नक्षलवादाने उद्ध्वस्त होत चाललेले आयुष्य, नात्यांमधील गुंतागुंत आणि जंगलातील धडकी भरवणारा वास्तव संघर्ष या ट्रेलरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. केवळ थरारक कथा नव्हे तर बाप-लेकीच्या नात्याची भावनिक गुंफण प्रेक्षकांच्या काळजाला भिडेल, अशी झलक ट्रेलरमध्ये दिसत आहे.

विशेष म्हणजे हा चित्रपट गडचिरोलीच्या खऱ्या जंगलात प्रत्यक्ष चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला अस्सलतेचा स्पर्श लाभला आहे. स्थानिक विदर्भी लहेजा, जंगलातील वास्तव दृश्ये आणि स्थानिक वातावरणामुळे चित्रपटाला जिवंतपणा आला असून प्रेक्षकांना हा अनुभव केवळ पडद्यावरचा सिनेमा न वाटता, प्रत्यक्ष जंगलात जगलेला प्रवास वाटेल.

‘ओरडू नका…’ उच्च न्यायालयात एकमेकांना भिडले करिश्मा आणि प्रियाचे वकील, इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे म्हणतात, ” ‘अरण्य’ ही केवळ नक्षलवादावरची गोष्ट नाही, तर ही जंगलात जगणाऱ्या सामान्य माणसाची, त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या नात्यांची गोष्ट आहे. आम्ही हा चित्रपट करताना कोणतीही कृत्रिमता ठेवली नाही. गडचिरोलीच्या दाट जंगलात प्रत्यक्ष शूट केल्यामुळे या चित्रपटाला एक अस्सल गंध मिळाला आहे.

कलाकारांनीही या वातावरणाशी स्वतःला एकरूप केलं. ‘अरण्य’चं वेगळेपण म्हणजे ही कथा सत्य घटनांनी प्रेरित आहे. ही केवळ थरारक नाही तर हृदयाला चटका लावणारीही आहे. यात नातेसंबंध आहेत, आशा आहे, आणि एक वेदना आहे. हा सिनेमा पाहाताना प्रेक्षकांना केवळ एक कथा दिसणार नाही, तर त्यांना जंगलाचा श्वास, त्यातील धडकी भरवणारा संघर्ष आणि नात्यांची उब जाणवेल.”

निर्माते शरद पाटील म्हणाले, ” ‘अरण्य’ हा आमच्यासाठी एक जाणीव आहे. आम्हाला सुरुवातीपासून हे माहीत होतं की ‘अरण्य’चा प्रवास सोपा नाही, कारण जंगलात प्रत्यक्ष शूट करणं ही एक मोठी धाडसाची गोष्ट आहे. परंतु त्यातूनच या सिनेमाला खरी ताकद मिळाली. या चित्रपटात सत्य, भावनिकता आणि थरार एकत्र गुंफला गेला आहे. मला खात्री आहे की, हा अनुभव प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील. सत्य घटनांनी प्रेरित ही कहाणी आणि जंगलातील थरारक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळा आणि लक्षात राहणारा सिनेमॅटिक अनुभव देईल.”

‘तुम्ही आगीत आणखी तेल ओतलं…’ कंगना रणौतला सुप्रीम कोर्टाने फटकारलं; अभिनेत्री स्वतःच्याच जाळ्यात फसली

एस. एस. स्टुडिओ आणि एक्स्पो प्रस्तुत, अदिक फिल्म्सच्या साहाय्याने, अमोल दिगांबर करंबे लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका असून, निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील आहेत. येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Hardik joshis upcoming movie aranya teaser released glimpse of veena jagtap savalyachi janu savali fame actress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 07:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.