(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड ‘पंगा क्वीन’ आणि भाजप खासदार कंगना रणौत शेतकरी आंदोलनावरील तिच्या पोस्टमुळे आता अडचणीत अडकली आहे. शेतकरी आंदोलनावर केलेल्या एका रिट्विटमुळे तिच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. यातून दिलासा मिळवण्यासाठी कंगनाने थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, पण कोर्टाने तिला जोरदार दणका दिला आहे. सोशल मीडिया कमेंट प्रकरणात अभिनेत्रीला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी स्पष्टपणे सांगितले की हे एक सामान्य ट्विट नव्हते तर तुम्ही त्यात आणखी मीठ मसाला टाकला आहे. २०२०-२१ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना रणौतने एका ७३ वर्षीय महिलेबद्दल आक्षेपार्ह रिट्विट केलं होतं. तिने म्हटलं होतं की, ‘शाहीन बागच्या आंदोलनात सामील झालेली ‘तीच’ आजी इथेही दिसतेय.’ यानंतर महिंदर कौर नावाच्या या महिलेने कंगनावर मानहानीचा खटला दाखल केला. कंगनाने हा खटला रद्द करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात याचिका केली होती, पण ती रद्द झाली.
हे फक्त री-ट्विट नाहीये, त्यात एक प्रकारचा मसाला
त्यानंतर कंगनाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली, पण कोर्टानेही तिच्यावर जोरदार ताशेरे ओढले. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने कंगनाच्या याचिकेवर नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती मेहता यांनी कंगनाच्या वकिलाला म्हटलं की, “हे फक्त एक साधं रिट्विट नाही. तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये मसाला टाकला आहे.” कंगनाच्या वकिलाने कोर्टात सांगितलं की, यावर कंगनाने स्पष्टीकरण दिलं आहे. यावर कोर्टाने म्हटलं की, “हे स्पष्टीकरण तुम्ही ट्रायल कोर्टात द्या.” वकिलांनी पंजाबमध्ये प्रवास करणं कठीण असल्याचं सांगितलं.
‘तो तर आठवड्याच्या शेवटी येऊन फुटेज खातो…’, ‘राईज अँड फॉल’च्या होस्टने सलमान खानची उडवली खिल्ली
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरं तर, या प्रकरणातील तक्रार ७३ वर्षीय महिंदर कौर यांनी दाखल केली आहे, ज्या २०२१ मध्ये पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील बहादुरगड जांडियन गावातील रहिवासी आहेत. त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये भटिंडा येथे तक्रार दाखल केली. भटिंडा न्यायालयात केलेल्या तिच्या तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की कंगनाने रिट्विटमध्ये तिच्यावर ‘खोटे आरोप’ केले आहेत आणि म्हटले आहे की ती तीच ‘आजी’ आहे जी शाहीन बाग निषेधाचा भाग होती.