फोटो सौजन्य - Colors सोशल मीडिया
हिना खान-बिग बॉस 18 : बिग बॉस १८ चर्चेत असलेला रिऍलिटी शोमध्ये मागील काही सीझनमधील असे अनेक स्पर्धक आहेत जे विजयी झाले नाहीत परंतु त्यांना त्याच्या कामगिरीने आणि व्यक्तिमत्वाने ओळखले जाते. यामध्ये हिना खान, शेहनाज गिल, राहुल वैद्य या सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यांनी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नाही परंतु त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे नाव कमावले आहे. सध्या प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान तिसऱ्या स्टेजच्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हिना खान मोठ्या हिमतीने या आजाराशी लढत आहे. दरम्यान, तो त्याच्या कामाच्या आघाडीवरही सक्रिय आहे. ती शूटिंग करताना दिसत आहे बाहेर देशांमध्ये हिंडताना दिसतात. हिना तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हिना खान बिग बॉस ११ मध्ये स्पर्धक म्हणून आली होती, यावेळी तिला या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आणि तिला नवी ओळख म्हणून शेर खान असे प्रेक्षकांनी संबोधले होते. आता पुन्हा एकदा हिना खान बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की, ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त हिना खान बिग बॉसच्या घरात पाहुणी म्हणून दिसणार आहे आणि आता हिना खानने तिचा भाग शूट केला आहे, ज्याचा प्रोमो व्हिडिओ देखील समोर आला आहे. हिना खान या वीकेंड वॉर एपिसोडमध्ये बिग बॉसमध्ये दिसणार आहे.
कलर्स वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये हिना खान, भाईजान हिना खानचे स्वागत करताना दिसत आहे. हिना खानचे स्वागत करताना सलमान खान म्हणतो- कृपया रिअल लाइफ फायटर हिना खानचे स्वागत करा. यानंतर भाईजान हिना खानला मिठी मारतो, त्यानंतर हिना खान म्हणते- माझ्या या सुंदर प्रवासातून मी माझ्यासोबत घेतलेली गोष्ट म्हणजे ताकद. या शोमध्ये मला एक अतिशय सुंदर टॅग मिळाला आहे, संपूर्ण जग मला शेरखान म्हणून ओळखते. यानंतर सलमान खान म्हणतो की तू नेहमीच फायटर राहिली आहेस, आणि प्रत्येक आव्हानाचा सामना करत आहेस, यावेळी हिना, तू एक हजार टक्के पूर्णपणे बरी होशील. सलमान खानचे हे शब्द ऐकून हिना खान भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
The OG Sher Khan ne Weekend Ke Vaar par dastak di hai, Salman ke chehre par muskuraahat chhayi hai. 😍✨
Dekhiye #BiggBoss18, aaj 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #BlueHeavenCosmetics #Harpic @mytridenthome… pic.twitter.com/Wm0EB5nGuY
— Bigg Boss (@BiggBoss) November 23, 2024