(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
क्लीम प्रोडक्शन् निर्मित आणि होम्बळे फिल्म्स प्रस्तुत, ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट प्रेक्षकांना एक अद्वितीय सिने अनुभव देण्यास सज्ज झाला आहे. आपल्या भव्यतेने, दृष्टिसुखद दृश्यांनी आणि प्रभावी कथनशैलीने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो खरोखरच वाखाणण्याजोगा आणि दर्जेदार आहे. हा चित्रपट जबरदस्त VFX ने भरलेला आहे. तसेच या VFX ने प्रेक्षकांचं लक्ष वेधले आहे.
या ट्रेलरद्वारे प्रेक्षकांना भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय पाहायला मिळाला आहे. ही कथा आहे भक्त प्रह्लाद याची, जो भगवान विष्णूचा निष्ठावान भक्त असतो. त्याचा विरोध करतो त्याचा स्वतःचा पिता, हिरण्यकशिपु, ज्याला ब्रह्मदेवाकडून अमरतेचे वरदान लाभलेले असते. प्रह्लादाच्या निष्ठेचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू नरसिंह अवतार धारण करतात. ज्याचा त्रासदायक आणि अद्भुत अवतरण ट्रेलरमध्ये थरारकपणे मांडण्यात आला आहे.
KD: The Devil चा अॅक्शनने भरलेला टीझर रिलीज, संजय दत्तच्या ॲक्शनने उडवली खळबळ !
ट्रेलरमध्ये गूजबंप्स देणारा पार्श्वसंगीत, उच्च दर्जाचे व्हिज्युअल्स आणि नाट्यमयता अनुभव पाहायला मिळणार आहे. अशा भव्यतेने सादर झालेला ‘नरसिंह अवतार’ आजवर कधीही रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाला नव्हता. याचबरोबर, क्लीम प्रोडक्शन्स आणि होम्बळे फिल्म्सने ‘महावतार सिनेमा युनिव्हर्स’ या दशकभर चालणाऱ्या ऍनिमेटेड फ्रँचायझीची घोषणा केली आहे. या मालिकेमध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा सादर केली जाणार आहे.
‘महावतार नरसिंह’ चे दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केले आहे. अश्विन कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे.अश्विन कुमार दिग्दर्शित आणि शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई निर्मित ‘महावतार नरसिंह’ २५ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये ३ डी स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.