Raveena Tanton
आज 26 जुलै रोजी भारत कारगिल विजय दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे. 1999 मध्ये शत्रूंचा पराभव करणाऱ्या सर्व जवानांच्या हौतात्म्याला आणि बलिदानाला आज आपण आदरांजली वाहतो आहोत. कारगिलमधील हे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये झाले होते ज्यात शेजारील देशाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनचाही भांडणाशी संबंध आहे, ज्याबद्दल क्वचितच चाहत्यांना माहिती असेल.
याचदरम्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन युद्धे लढली असून तिन्ही युद्धे जिंकली आहेत. कारगिलमध्ये झालेल्या शेवटच्या युद्धात लढलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा विजय दिवस साजरा केला जातो. संपूर्ण भारताला त्या शूर सुपुत्रांचा अभिमान आहे. अशा परिस्थितीत, आपण वर्षानुवर्षे कारगिल युद्धाशी संबंधित किस्से आपण ऐकत आले आहोत, त्यापैकी एक म्हणजे 80-90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या रवीनाची प्रसिद्ध कथा याचा देखील या मध्ये समावेश आहे.
कारगिल युद्धात रवीना टंडनचे नाव पुढे आले होते
समोर उभ्या असलेल्या पाकिस्तानी सैन्याला जेव्हा भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले तेव्हा त्यांनी रवीना टंडनचे नाव घेतले. कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी एका मुलाखतीत रवीना टंडन त्यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा केला होता. पुढे 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी गंमतीने रवीना आणि माधुरी दीक्षितला भारतीय जवानांच्या मृतदेहाच्या बदल्यात मागणी केली. आणि या गोष्टीची भरपूर चर्चा सुद्धा सुरु होती.
हे देखील वाचा- ‘कारगिलच्या युद्धातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही’; पंतप्रधान मोदींचा थेट हल्लाबोल
त्यानंतर त्यांच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने असे चोख उत्तर दिले जे पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही. खरे तर कारगिल युद्धादरम्यान भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये बॉम्ब टाकला होता, ज्यावर लिहिले होते, “नवाज शरीफ फ्रॉम रवीना टंडन”. (रवीना टंडनकडून नवाझ शरीफ यांना) एवढेच नाही तर क्षेपणास्त्रावर त्यांच्या नावासह हृदय आणि बाणही बनवण्यात आला होता.
रवीना टंडन आणि कारगिलची जगभरात चर्चा झाली
या घटनेची त्या दिवसांत भारत-पाकिस्तानातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरु झाली होती. यासोबतच प्रत्येक वृत्तपत्रात बॉम्बचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यावर “नवाज शरीफ यांच्यासाठी रवीना टंडनकडून” असे लिहिले होते. त्यानंतर एका न्यूज पोर्टलशी बोलताना अभिनेत्रीने या घटनेवर आपले मौन सोडले आणि सांगितले की, मला हे खूप दिवसांनी कळले. त्यांनी लोकांना समस्या प्रेमाने सोडवण्याचा सल्लाही दिला.