फोटो सौजन्य - instagram
स्टार प्लस पुन्हा एकदा ‘ईशानी’ ही एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी कथा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परतली आहे. जी केवळ एका महिलेचा संघर्ष दाखवत नाही तर समाजाच्या बंधनात बांधलेल्या स्वप्नांचा प्रतिध्वनी म्हणूनही समोर येते. हा नवीन काल्पनिक शो त्या सर्व महिलांचा आवाज म्हणून उदयास येते ज्या लग्नानंतर त्यांची ओळख आणि आदर शोधण्यासाठी मूक लढाई लढत आहेत.
एक मुलगी, एक स्वप्न आणि एक आव्हानात्मक प्रवास
‘ईशानी’ ही एका तरुण, महत्त्वाकांक्षी मुलीची कथा आहे जी आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहते. परंतु लग्नानंतर, तिच्या स्वप्नांवर जबाबदाऱ्यांचे ओझे लादले जाते. समाजाची विचारसरणी आणि कुटुंबाच्या मर्यादांमध्ये अडकलेली, ईशानी केवळ तिचा उत्साह जिवंत ठेवत नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी दररोज लढताना या मालिकेमध्ये दिसणार आहे. “मैं पंछी हूं आसमान की, पिंजरे की नहीं” या प्रोमोमधील तिचा शक्तिशाली संवाद दाखवतो की ईशानी ही केवळ एक पात्र नाही तर परिस्थितीशी तडजोड न करणाऱ्या प्रत्येक महिलेची ओळख आहे.
‘Saiyaara’ च्या यशाबद्दल दिग्दर्शक मोहित सुरीने व्यक्त केले मत; म्हणाले ‘मी कधीच विचार केला नव्हता…’
ईशानीच्या एका आकर्षक एकपात्री प्रयोगाने प्रोमोला सुरुवात होते. ती स्वतःची तुलना पिंजऱ्याशी नव्हे तर आकाशाशी नाते सांगणाऱ्या पक्ष्याशी करते. जरी ती विवाहित आहे आणि नियमांमध्ये बांधली गेलेली आहे, तरी तिचे मन मोकळे आहे. तिच्या नवऱ्याची अपेक्षा असते की, तिने एक महत्त्वाकांक्षी आयपीएस अधिकारी म्हणून तिची ओळख विसरून घराची आणि मुलांची काळजी घ्यावी. ईशानीला कॉलेजला जाण्याची परवानगी जरी असली तरी कुणाशी बोलायचे नाही यांसारखे कडक नियम तिच्यावर लादले गेलेले आहेत.
जेव्हा ती वर्गात प्रवेश करते आणि तिला कळते की, तिला शिकवणारा तिचा प्राध्यापक- अनुराग आहे, जो तिचा एक्स प्रियकर असतो. अनुराग तिला विचारतो की, तिने त्याची वाट का पाहिली नाही? भावनांनी आणि निर्णयांनी भरलेल्या अशा भूतकाळाकडे अनुराग निर्देश करतो, ज्या भूतकाळाने दोघांना पुरते विलग केले. मालिकेच्या ‘प्रोमो’मध्ये वैयक्तिक स्वप्ने आणि लादलेली कर्तव्ये यांच्यात कसरत सुरू असलेल्या ईशानीच्या भावनिक आणि मानसिक गोंधळाचे चित्रण आहे.
अनुराग कश्यपच्या ‘Nishaanchi’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, जाणून घ्या चित्रपट कधी होणार रिलीज?
या मंगळवारपासून सुरू होत आहे मालिका
स्टार प्लसवर प्रसारित होणारा हा शो दर मंगळवारी संध्याकाळी ७:२० वाजता दाखवला जाणार आहे. ‘ईशानी’ हा एक असा शो आहे जो केवळ पाहिला जाणार नाही तर अनुभवलाही जाणार आहे कारण ही कहाणी एका व्यक्तीची नाही तर आपल्या सर्वांची आहे. या शोमध्ये भावना, संघर्ष आणि स्वावलंबनाचे रंग सुंदरपणे विणले गेले आहेत. ईशानीच्या प्रत्येक हास्य आणि अश्रूमध्ये प्रेक्षकांना स्वतःची किंवा त्यांच्या सभोवतालच्या एखाद्या महिलेची झलक नक्कीच दिसेल.