Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saif Ali Khan: अभिनेत्याच्या प्राणघातक हल्ल्यावर समोर आली कलाकारांची प्रतिक्रिया; पूजा भट्टसह या अभिनेत्याने केले ट्विट!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याची बातमी ऐकल्यानंतर पॅन इंडिया स्टार ज्युनियर एनटीआर आणि पूजा भट्ट यांनी सोशल मीडियाद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 16, 2025 | 12:04 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

आज सकाळी सैफ अली खानवर धक्कादायक हल्ला झाला आहे. सैफवर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर, सैफला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, जिथे न्यूरोसर्जनच्या पथकाने त्याच्यावर उपचार केले आहेत. तथापि, सैफ धोक्याबाहेर आहे. त्याच वेळी, सैफवरील हल्ल्यामुळे त्याचे चाहते आणि सहकलाकार खूप चिंतेत आहेत. ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त, पूजा भट्टनेही सैफवरील हल्ल्यावर त्यांची प्रतिक्रिया मंडळी आहे. जाणून घेऊयात हे कलाकार काय म्हटले आहेत.

ज्युनियर एनटीआरची पोस्ट
दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरने त्याच्या ‘देवरा’ चित्रपटातील सहकलाकार सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची बातमी ऐकल्यानंतर दुःख व्यक्त केले आहे. सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी प्रवेश करताना चाकूने हल्ला झाला होता. एक्स वर बोलताना ज्युनियर एनटीआर यांनी लिहिले, “सैफ सरांवरील हल्ल्याबद्दल ऐकून धक्का बसला आणि दुःख झाले. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना.” असे लिहून अभिनेत्याने एक्सवर ट्विट केले आहे. यासह अभिनेत्री पूजा भट्टची देखील प्रतिक्रिया आली आहे.

 

Shocked and saddened to hear about the attack on Saif sir.

Wishing and praying for his speedy recovery and good health.

— Jr NTR (@tarak9999) January 16, 2025

पूजा भट्टची पोस्ट
अभिनेत्री पूजा भट्टने सैफ अली खानवरील हल्ल्याचा निषेध केला आहे आणि वांद्रे येथे अधिक पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. पूजा भट्टनेही सैफवरील प्राणघातक हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आणि इंस्टाग्रामवर लिहिले, “ही गोंधळ रोखता येईल का? मुंबई पोलिस, सीपीमुंबई पोलिस, आम्हाला वांद्रेमध्ये अधिक पोलिसांची उपस्थिती हवी आहे. शहराला, विशेषतः उपनगरांना, यापूर्वी कधीही इतके असुरक्षित वाटले नव्हते. कृपया लक्ष द्या.” असे लिहून अभिनेत्रीने आपले मत मांडले आहे.

Saif Ali Khan: सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत अधिकृत निवेदन जारी, सैफच्या टीमने काय म्हटले?

संपूर्ण प्रकरण काय आहे?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. त्याच्यावर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले आणि त्याच्या पाठीच्या कण्यालाही दुखापत झाली आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफला पहाटे ३:३० च्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले, जिथे त्याला चाकूने सहा वार करण्यात आले होते, त्यापैकी दोन खोल होते. सध्या मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक सैफ अली खानच्या घरी आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. चाहते आणि सेलिब्रिटी सैफच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल चिंतेत आहेत आणि त्याच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.

Web Title: Jr ntr shocked saddened after devara co star saif ali khan stabbed attacked house break in pooja bhatt react

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत
1

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत

काय सांगता! सैफ अली खानला मुंबई सोडायचीय? हल्ल्या प्रकरणानंतर ३ महिन्यांनी परदेशात खरेदी केले आलिशान घर!
2

काय सांगता! सैफ अली खानला मुंबई सोडायचीय? हल्ल्या प्रकरणानंतर ३ महिन्यांनी परदेशात खरेदी केले आलिशान घर!

२० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत ‘ज्वेल थीफ’ चित्रपटातील ‘या’ गाण्यात करणार रोमान्स, होतेय गाण्याची जोरदार चर्चा
3

२० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत ‘ज्वेल थीफ’ चित्रपटातील ‘या’ गाण्यात करणार रोमान्स, होतेय गाण्याची जोरदार चर्चा

हल्ला झाल्यानंतर करीना कपूर सैफ अली खानला काय म्हणाली ? चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा
4

हल्ला झाल्यानंतर करीना कपूर सैफ अली खानला काय म्हणाली ? चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.