(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सैफ अली खानवर त्याच्या घरी एक अज्ञाताने चाकूने हल्ला केला आहे. यादरम्यान आता बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, अभिनेत्याचे अधिकृत विधान समोर आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना विनंती करतो की कृपया धीर धरा. ही पोलिसांची बाब आहे. पुढील परिस्थितीबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत राहू.’ असे लिहून अभिनेत्याच्या टीमने हे विधान जाहीर केले आहे.
अज्ञात व्यक्तीशी भांडण
वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या मुंबईतील घरात प्रवेश केला. त्याच्या मोलकरणीशी वाद सुरू झाला. जेव्हा सैफ तिथे पोहोचला आणि भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची एका अज्ञात व्यक्तीशी झटापट झाली. यादरम्यान, त्या व्यक्तीने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्या आणि या झटापटीत अभिनेता जखमी झाला आहे.
रुग्णालयात सुरू आहे उपचार
जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा करीना कपूर खान तिच्या दोन्ही मुलांसह तैमूर आणि जेहसोबत घरी होती. हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लीलावती रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अलीला पहाटे ३:३० च्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या शरीरावर ६ जखमा आहेत, त्यापैकी दोन गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्याच्या मणक्याजवळ एक दुखापत झाली आहे.
सैफ अली खानचा आगामी चित्रपट
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सैफ अली खानही सध्या सिनेमात वेळ घालवत आहे. हा अभिनेता शेवटचा ‘देवरा भाग १’ मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसला होता. तर सैफ जयदीप अहलावतसोबत ज्वेल थीफमध्ये दिसणार आहे. आधी जयदीप अहलावतच्या वडिलांचे निधन आणि आता सैफ अली खान जखमी झाल्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.
Saif Ali Khan: या चित्रपटांमधून अभिनेत्याने केले बॉलिवूडवर राज्य; आता आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक!
पोलिसांची प्रतिक्रिया
वांद्रे डीसीपी म्हणाले, हे खरे आहे, एक अज्ञात व्यक्ती पहाटे २.३० वाजता सैफ अली खानच्या घरात घुसला. यादरम्यान एका चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. यानंतर, त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे डीसीपीने सांगितले. तथापि, या दुखापती इतक्या गंभीर नाहीत. हाणामारीत त्याला चाकूने वार करण्यात आले की जखमी झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बातमीने अभिनेत्याचे चाहते चांगलेच चकित झाले आहेत.