Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kareena Kapoor: ‘मी रस्त्यावर ओरडत होते…’; सैफवरील हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं? करीनाने ‘कॉफी विद करण’मध्ये सांगितला अनुभव

Kareena Kapoor: ‘कॉफी विथ करण ९’मध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी सैफवरील चाकूहल्ल्याच्या घटनेबद्दल खुलासा केला. त्या रात्री काय घडलं याबद्दल करीनाने सांगितला अनुभव.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 05, 2026 | 08:30 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kareena Kapoor: ‘कॉफी विथ करण ९’च्या नव्या एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एकत्र दिसली. तब्बल १६ वर्षांनंतर या जोडप्याने करण जोहरच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. गेल्या वर्षी सैफ अली खानवर त्याच्या घरात झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेबद्दलही त्यांनी भाष्य केलं. त्या रात्री नेमकं काय घडलं, करीना कशी घाबरली होती आणि मुलांनी या घटनेला कसा प्रतिसाद दिला, याचा अनुभव त्यांनी सांगितला.

‘मी रस्त्यावर ओरडत होते’; करीनाने सांगितला त्या रात्रीचा अनुभव

सैफवरील हल्ल्याच्या रात्रीची आठवण सांगताना करीना भावुक झाली. ती म्हणाली, “मी रस्त्यावर ऑटो-रिक्षा थांबवत होते. मी रस्त्यावर ओरडत होते. मी वेड्यासारखी धावत होते आणि सैफच्या शरीरातून रक्त वाहत होतं.” या घटनेनंतर जवळपास सहा महिने आपल्याला नीट झोप लागली नसल्याचं करीनाने सांगितले.

त्या कठीण प्रसंगात सैफला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी केलेल्या प्रयत्नांबद्दलही तिने सांगितलं. करीना म्हणाली की, त्या वेळी सैफला चालताही येत नव्हतं. त्याच्या पाठीच्या कण्याजवळ अडकलेला चाकू काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. या सगळ्या प्रसंगामुळे ती पूर्णपणे खचली होती, मात्र सैफने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र

घरात घुसून हल्लेखोराने केला चाकूने वार

१६ जानेवारी २०२५ रोजी एक घुसखोर सैफ आणि करीनाच्या घरात शिरला होता. त्याने घरातील मदतनीस महिलेला ओलीस ठेवलं होतं. सैफने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यात झटापट झाली. यावेळी हल्लेखोराने सैफवर चाकूने वार केले. जखमी सैफला तातडीने रिक्षाने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करण्यात आली.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तीन दिवसांनी आरोपी मोहम्मद शरीफुलला अटक केली. आरोपीने गुन्हा कबूल करण्याचा दुसरा प्रयत्न न्यायालयाने फेटाळल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. गेल्या महिन्यात या सुनावणीला सुरुवात झाली होती.

घराणेशाहीवरून करण जोहरसोबत रंगली मजेशीर चर्चा

या एपिसोडमध्ये सैफ, करीना आणि करण जोहर यांच्यात घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मजेशीर संवादही रंगला. एका सेगमेंटमध्ये विजय मिळवल्यानंतर सैफने गंमतीने म्हटलं की, यावरून करणच्या शोमध्ये घराणेशाही किंवा वशिलेबाजी नसल्याचं सिद्ध होतं.

त्यावर करणने करीनाकडे बोट दाखवत तिचं उदाहरण दिलं. हे ऐकून करीनानेही विनोदी अंदाजात उत्तर दिलं. “मी घराणेशाहीची सर्वात शुद्ध पोस्टर गर्ल आहे. मी घराणेशाहीची सर्वात नैसर्गिक प्रतिभा आहे. मी माझ्या आई-वडिलांचा कधीच उल्लेख केलेला नाही,” असं ती म्हणाली. तिचं उत्तर ऐकून करण आणि सैफही हसू लागले.

Ladaku Movie Release Date : Kartik Aaryan आणि Kabir Khan ची जोडी पुन्हा एकदा सज्ज! ‘लडाकू’ चित्रपट 18 जून 2027 रोजी होणार रिलीज

Web Title: Kareena kapoor recalls saif ali khan attack coffee with karan 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • entertainment
  • Kareena Kapoor
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण
1

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण

Saawan Aaya Hai Song: आयुष्मान खुराना-शर्वरीची पावसात रंगली प्रेमकहाणी; सूरज बडजात्यांचं नवं रोमँटिक गाणं
2

Saawan Aaya Hai Song: आयुष्मान खुराना-शर्वरीची पावसात रंगली प्रेमकहाणी; सूरज बडजात्यांचं नवं रोमँटिक गाणं

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
3

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Zee Marathi New Serial: उषा नाडकर्णी झी मराठीवर कमबॅक करणार; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत पूजा बिरारीची मुख्य भूमिका
4

Zee Marathi New Serial: उषा नाडकर्णी झी मराठीवर कमबॅक करणार; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत पूजा बिरारीची मुख्य भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.