Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुनैद खानचा खुलासा; ‘तारे जमीन पर’ची स्क्रिप्ट वाचताना आमिर खानला मिळाली मुलाच्या आजाराची माहिती!

नुकताच जुनैद खान त्याच्या बालपणीचे किस्से शेअर करताना दिसला. यादरम्यान त्याने सांगितले की, 'तारे जमीन पर' चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत असताना आमिर खानला समजले की जुनैद डिस्लेक्सियाशी झुंज देत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 06, 2025 | 06:05 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान याने 2024 साली ‘महाराज’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आता तो त्याच्या आगामी ‘लवयापा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो खुशी कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान जुनैद खानने नुकतेच त्याच्या बालपणीचे किस्से शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, तो लहानपणी डिस्लेक्सियाशी झुंज देत होता. ‘तारे जमीन पर’ चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत असताना त्याचे वडील आमिर खान यांना मुलाच्या आजाराची माहिती मिळाली होती.

पालकांच्या लक्षात आले
जुनैद खानने अलीकडेच खुलासा केला की, ‘तारे जमीन पर’ चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना त्याचे आई-वडील आमिर खान आणि रीना दत्ता यांना समजले की जुनैदलाही डिस्लेक्सियाचा त्रास आहे. या अभिनेत्याने सांगितले की, त्याच्या पालकांनी ओळखले आहे की चित्रपटातील पात्राला ज्या अडचणी येत होत्या त्याच अडचणी मुलाला देखील येत होत्या. जुनैदने विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

Ram Kapoor: खरंच राम कपूरने सर्जरीद्वारे घटवले वजन? ट्रान्सफॉर्मेशनबाबत अभिनेत्याने सोडले मौन!

वयाच्या सहाव्या वर्षी ही स्थिती लक्षात आली
जुनैद खानने सांगितले की, त्याच्या पालकांना त्याच्या डिस्लेक्सियाबद्दल खूप लवकर माहिती होती. त्यामुळे त्यांनी पूर्ण काळजी घेतली. विशेषतः शालेय अभ्यासाची त्यांनी खूप काळजी घेतली. जुनैद खानने सांगितले की, त्यांची प्रकृती सहा-सात वर्षांची असताना घरच्यांना समजली. पण, लवकर निदान झाल्यानंतर त्याच्या पालकांनी वैद्यकीय मार्गदर्शन घेतले. अभिनेत्याने सांगितले की लवकर ओळख झाल्यामुळे, या स्थितीचा नंतर त्याच्यावर परिणाम झाला नाही आणि तो यासाठी स्वत: ला भाग्यवान समजतो. असे अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितले.

Fateh Trailer 2: सोनू सूदच्या ‘फतेह’चा दुसरा ट्रेलर रिलीज; सलमान खानने दिल्या शुभेच्छा तर महेश बाबूने केली प्रशंसा!

‘लवयापा’ कधी प्रदर्शित होणार?
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जुनैद खानचा ‘लवयापा’ चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जुनैदचा ‘महाराज’ OTT वर प्रदर्शित झाला होता, तर आता ‘लवयापा’ हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा त्याचा पहिला चित्रपट आहे. खुशी कपूरसोबतची त्याची जोडी कशी जमते हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटाचा टायटल ट्रॅक नुकताच रिलीज झाला होता. जो पाहून चाहत्यांना या दोघांची जोडी खूप आवडली आहे.

Web Title: Junaid khan revealed that father aamir khan discovered his dyslexia while reading taare zameen par script

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • Aamir Khan

संबंधित बातम्या

लाल सिंह चड्ढा” नंतर नागा चैतन्य हिंदी चित्रपटांपासून दूर; अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…
1

लाल सिंह चड्ढा” नंतर नागा चैतन्य हिंदी चित्रपटांपासून दूर; अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…

थिएटरनंतर आता OTT वर ‘हॅपी पटेल’ची एंट्री, कधी आणि कुठे पाहता येईल चित्रपट जाणून घ्या
2

थिएटरनंतर आता OTT वर ‘हॅपी पटेल’ची एंट्री, कधी आणि कुठे पाहता येईल चित्रपट जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.