(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. २०२५ मधील सर्वात जास्त अपेक्षा ठेवण्यात आलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या याचित्रपटाचा हिंदी ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे, आणि विशेष म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशन लॉन्च करणार आहे .
चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस होम्बळे फिल्म्स यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही घोषणा केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये ‘कांतारा चॅप्टर १’ च्या नावासोबत ऋतिक रोशनचा फोटो देखील झळकतो. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे:“#Kantara ची गर्जना आता संपूर्ण जगात घुमणार आहे,”असं कॅप्शन देत ही पोस्ट इन्स्टाग्रामवर करण्यात आली आहे.
पत्नी ट्विंकलसोबत मूव्ही डेटवर अक्षय कुमार, हात हातात घेऊन दिल्या खास पोझेस
‘कांतारा चॅप्टर १’ यंदा २ ऑक्टोबर २०२५ रोजी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी या सात भाषांमध्ये रिलीज होणार आहे , त्यामुळे तो संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुक्मिणी वसंत “कंकवती” ची भूमिका साकारणार आहे, ज्याचे डबिंग तिने नुकतेच पूर्ण केले आहे. या चित्रपटापूर्वी ती “मधरसी” मध्ये दिसली होती, ज्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे.
कठीण परिस्थिती असूनही सलमान खानने पूर्ण केले ‘बॅटल ऑफ गलवान’ चे पहिले शेड्यूल!
अभिनेत्री रुक्मिणीने “कांतारा चॅप्टर १” चे डबिंग पूर्ण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्वतःच्या आवाजात मजा करताना दिसत आहे. तिने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, “कंकवती तुमच्या मार्गावर येत आहे.” कांतारा चॅप्टर १ चा पहिला भाग २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. फक्त १६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने अंदाजे ४०२ कोटी रुपयांच्या प्रभावी बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचा दुसरा भाग देखील अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल आणि २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल. चित्रपटात जयराम, राकेश पुजारी आणि गुलशन देवैया यांच्यासह ऋषभ शेट्टी आणि रुक्मिणी वसंत यांचा समावेश आहे.