(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी 3’ मुळे चर्चेत आहे. नुकताच तो पत्नी ट्विंकल खन्नासोबत मूव्ही डेटवर गेला होता. मुंबईतील एका सिनेमागृहाबाहेर अक्षय कुमारने ट्विंकलचा हात हातात घेत पॅपराझींना खास पोझेस दिल्याआहेत. सोशल मीडियावर या दोघांचे व्हिडिओ आणि फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘जॉली एलएलबी 3’ने बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १२ कोटी कमावले आहेत.१९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘जॉली एलएलबी 3’ हा चित्रपट अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिकांसह मोठ्या पडद्यावर झळकला आहे.या भागात अक्षय कुमारने ‘जॉली मिश्रा’ आणि अर्शद वारसीने ‘जॉली त्यागीच्या भूमिकेत आहेत. याशिवाय सौरभ शुक्ला, गजराज राव, अमृता राव आणि हुमा कुरेशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात पाहायला मिळतात.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी केलेल्या स्टाइलिश पोझेसमुळे चाहते फिदा झाले आहे. या जोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिले आहे. एका चाहत्याने इंस्टाग्रामवर लिहिले, “किती छान जोडपं आहे.” दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, “दोघे एकत्र फार छान दिसत आहेत.” तर एक युजरने कमेंट केली आहे, “अक्षय आणि ट्विंकल यांचा हा दुर्मिळ व्हिडिओ पाहून आनंद झाला.”
‘बाबुराव’च्या पात्रावरून वाद! फिरोज नाडियाडवालांची नेटफ्लिक्स आणि कपिल शोवर कायदेशीर कारवाई
अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल लवकरच त्यांच्या नवीन टॉक शो ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ साठी सज्ज आहेत. या अनोख्या शोमध्ये बॉलिवूडचे दिग्गज आणि तरुण कलाकार एकत्र येणार आहेत.या शोमध्ये सलमान खान, आमिर खान, गोविंदा, आलिया भट्ट, वरुण धवन, करण जोहर, कृती सेनन, विक्की कौशल, जान्हवी कपूर आणि अनेक इतर कलाकार पाहुणे म्हणून सहभागी होतील.