(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने एका नवीन मालिकेची घोषणा केली आहे. मालिकेचा पहिला पोस्टर रिलीज करताना करणने त्याच्या प्रदर्शन तारखेची माहितीही शेअर केली आहे. या मालिकेत अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता ही मालिके प्रेक्षकांना कुठे आणि कधी पाहता येणार आहे. तसेच ही रिलीज कधी रिलीज होणार आहे आणि याचे नाव काय आहे आपण जाणून घेणार आहोत.
प्राइम व्हिडिओवर होणार रिलीज
करण जोहरने ‘डू यू वॉना पार्टनर’ या नवीन मालिकेची घोषणा केली आहे. करणने आज त्याच्या इन्स्टाग्रामवर या मालिकेचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये मालिकेतील मुख्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी दिसत आहेत. पोस्टरमध्ये दोन्ही अभिनेत्री चष्मा घातलेल्या दिसत आहेत. करणने या रिलीज प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे, त्यानुसार ही नवीन मालिका १२ सप्टेंबरपासून प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे.
‘KGF’ फेम अभिनेता दिनेश मंगळुरू यांचे निधन, कन्नड इंडस्ट्रीत पसरली शोककळा
‘वो आ रही है…’, ‘नागिन ७’ चा टीझर रिलीज, लवकरच दिसणार ‘इच्छाधारी नागिन’ची झलक
‘डू यू वॉना पार्टनर’ संपूर्ण स्टारकास्ट
तसेच, या मालिकेबद्दल अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही किंवा त्यातील कलाकारांचा खुलासा झालेला नाही. परंतु करण जोहरने त्याच्या पोस्टमध्ये तमन्ना आणि डायना व्यतिरिक्त नकुल मेहता, श्वेता तिवारी, जावेद जाफरी, नीरज कबी आणि रणविजय सारख्या स्टार्सचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे हे स्टार्स देखील मालिकेचा एक प्रमुख भाग असू शकतात अशी अपेक्षा आहे.