(फोटो सौजन्य - अकाउंट)
प्रसिद्ध ‘कराटे किड’ फ्रँचायझी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज आहे. सोनीने ‘कराटे किड: लेजेंड्स’ या नवीन चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटात जुना नायक राल्फ मॅकियो पुन्हा एकदा डॅनियल लारुसोच्या भूमिकेत दिसणार आहे. तो १९८४ मध्ये आलेल्या मूळ चित्रपटाचा भाग होता. या चित्रपटात तो जॅकी चॅनसोबत दिसणार आहे, अभिनेत्याने २०१० च्या रिमेकमध्ये मिस्टर हानची भूमिका केली होती.
नवीन चित्रपटाची कथा काय असेल?
या चित्रपटाच्या नवीन ट्रेलरला ७ लाख ४४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटाची कथा ‘कोब्रा काई’च्या शेवटच्या सीझनच्या तीन वर्षांनंतर काय घडते यावर आहे. चित्रपटात, बेन वांग ली फोंगची भूमिका साकारतो, जो एक तरुण कुंग फू फायटर आहे. एका दुःखद कौटुंबिक घटनेनंतर, ली त्याच्या आईसह बीजिंगहून न्यू यॉर्क शहरात राहायला जातो. नवीन ठिकाणी शाळेत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागवो. तो शाळेतील भांडण टाळण्याचा प्रयत्न करतो, पण परिस्थिती त्याला त्यात भाग पाडते. जेव्हा त्याचा मित्र अडचणीत येतो तेव्हा ली कराटे स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतो. आणि या चित्रपटाची कथा सुरुची होते.
ऋषभ शेट्टीच्या ‘Kantara Chapter 1’ बद्दल समोर आली खास बातमी, कधी होणार चित्रपट रिलीज!
जॅकी चॅनसोबत रॉक करणार राल्फ मॅकचियो
तसेच, या चित्रपटामधील लीचे कुंग फू कौशल्य पुरेसे नाही. त्याला तयार करण्यासाठी, मिस्टर हान (जॅकी चॅन) त्याचा जुना मित्र डॅनियल लारुसो (राल्फ मॅचियो) ची मदत घेतो. ते दोघे मिळून ली ला प्रशिक्षण देतात आणि कराटे आणि कुंग फू एकत्र करून एक नवीन शैली तयार करतात. ट्रेलरच्या शेवटी, डॅनियल ली ला सांगतो, “तुम्ही कशासाठी लढत आहात ते लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला ते कळेल तेव्हा तुम्ही तयार व्हाल.” असं तो म्हणताना या ट्रेलरमध्ये दिसत आहे.
Panchayat: फुलेराच्या ‘पंचायत’ ला झाली ५ वर्षे पूर्ण, निर्मात्यांनी सीझन ४ बद्दल दिली खास बातमी!
चित्रपटात दिसणार हे स्टार कलाकार
या चित्रपटाचे दिग्दर्शन जोनाथन एंटविस्टल यांनी केले आहे. त्याची पटकथा रॉब लिबर यांनी लिहिली आहे. हे करेन रोझेनफेल्ट यांनी तयार केले आहे, तर राल्फ मॅकचियो हे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटात जोशुआ जॅक्सन, सॅडी स्टॅनली, मिंग-ना वेन आणि अरामिस नाइट यांच्याही भूमिका आहेत. ‘कराटे किड: लेजेंड्स’ चा पहिला ट्रेलर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आला होता.