Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरके चुनर’ गाण्यामुळे वाढल्या संजय दत्त आणि नोराच्या अडचणी; राष्ट्रीय महिला आयोग कडून बजावले समन्स

नोरा फतेही आणि संजय दत्त वादात सापडले आहेत. 'केडी: द डेव्हिल' या चित्रपटातील 'सरके चुनर' या गाण्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना समन्स बजावले आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 07, 2026 | 11:29 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सरके चुनर’ गाण्यामुळे वाढला वाद
  • संजय दत्त आणि नोरा फतेही अडचणी
  • राष्ट्रीय महिला आयोगाने बजावले समन्स
 

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्त सध्या त्यांच्या आगामी ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आतापर्यंत या चित्रपटासंदर्भात अनेक घडामोडी समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘केडी: द डेव्हिल’ चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे प्रदर्शित होताच त्याने गदारोळ माजवला. या गाण्यावरून इतका वाद निर्माण झाला की, त्याची हिंदी आवृत्ती काढून टाकावी लागली. पण गाणे काढून टाकल्यानंतरही नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. आता याच गाण्यासंदर्भात संजय दत्त आणि नोरा फतेही यांना समन्स बजावण्यात आले आहे.

नोरा फतेही आणि संजय दत्तला बजावले समन्स

‘सरके चुनर तेरी’ हे गाणे अलीकडच्या काळातील सर्वात वादग्रस्त गाण्यांपैकी एक मानले जाते. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या गाण्याशी संबंधित असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली आहे. आक्षेपार्ह गीतांसाठी आयोगाने अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्त यांना समन्स बजावले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने स्पष्टपणे म्हटले आहे की, “महिलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली जाऊ शकत नाही,” आणि हे प्रकरण आता एका गंभीर वळणावर आले आहे.

Worldwide Collection: 2000 कोटींच्या दिशेने धावतोय रणवीर सिंगचा Dhurandhar 2; बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम

तसेच आयोगाने स्वतःहून दखल घेतली आणि ६ एप्रिल रोजी सुनावणी घेतली. नोरा फतेहीच्या वतीने तिचे वकील हजर झाले, परंतु आयोगाने तिला वकिलामार्फत हजर राहण्याची परवानगी नाकारली आणि अभिनेत्रीला स्वतः हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय महिला आयोगाने आता नोरा फतेहीला शेवटची संधी दिली असून, तिला २७ एप्रिल २०२६ रोजी स्वतः हजर राहण्यास सांगितले आहे.

सुनावणीदरम्यान हे उघड झाले

एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सुनावणीचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी गाण्याच्या गीतांवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि ते केवळ आक्षेपार्हच नव्हे तर महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले. गीतांचा अर्थ आपल्याला माहीत नव्हता, असा दावा करणाऱ्यांचा दावा रहाटकर यांनी फेटाळून लावला. अशा स्पष्टीकरणांमुळे गाण्याचा प्रभाव नाहीसा होणार नाही, असे त्यांनी सांगितले. गीतकार रकीब आलम, दिग्दर्शक प्रेम आणि केव्हीएन प्रॉडक्शन्सचे प्रतिनिधी सुनावणीदरम्यान हजर होते. त्यांनी लेखी माफी मागितली आणि गाण्याचा समाजावर नकारात्मक परिणाम झाल्याचे मान्य केले. त्यांनी पुढील तीन महिन्यांत महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि एनसीडब्ल्यूला अहवाल सादर केला. आयोगाने संजय दत्तला ८ एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देशही दिले.

‘सनई चौघडे’च्या सेटवर राज हंचनाळेचा ‘fan moment’; चिन्मय मांडलेकरसोबतचा सांगितला खास क्षण

गाण्याच्या शब्दांवरून झाला गोंधळ

‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याच्या गीतांवरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर नोरा फतेहीने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, हा वाद अजूनही संपला नाही आहे. ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याबद्दल वाद आता थांबणार की नाही हे पाहणे बाकी आहे.

Web Title: Kd the devil sanjay dutt and nora fatehi face trouble due to sarke chunar ncw issues summons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Bollywood
  • Nora Fatehi
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!
1

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन
2

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा
3

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव
4

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.