
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने त्यांच्या लहान मुलीची पहिली झलक शेअर केली आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, कियारा आणि सिद्धार्थने तिचे नाव देखील उघड केले आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या मुलीचे नाव खूपच वेगळे आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या बॉलीवूड कपलचे चाहते आणि कलाकार अभिनंदन करत आहेत.
मुलीचे अनोखे नाव उघड
कियारा आणि सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर गोड लेकीचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांच्या मुलीचा चेहरा उघड न करता तिचे गोंडस चिमुकले पाय दिसत आहेत. या जोडप्याने त्यांच्या मुलीच्या पायांचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये त्यांच्या मुलीचे नाव देखील उघड केले आहे. कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या लहान मुलीचे नाव सरायाह मल्होत्रा ठेवले आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना या जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “आमच्या प्रार्थनेतून आमच्या कुशीत येणारी आमची राजकुमारी. सरायाह मल्होत्रा.” असे लिहून ही पोस्ट शेअर केली आहे.
या नावाचा अर्थ काय आहे?
या जोडप्याने त्यांच्या छोट्या राजकुमारीचे नाव आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्या मुलीपेक्षाही वेगळे ठेवले आहे. सरायाह या नावाचा अर्थ “देवाची राजकुमारी” असा होतो. हा शब्द हिब्रू भाषेतून आला आहे. या जोडप्याने शेअर केलेल्या फोटोवर आता असंख्य सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या छोट्या राजकुमारीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाला आहे.
मुलगी झाली हो! अरुण गवळी दुसऱ्यांदा झाले आजोबा, जावयाने दिली आनंदची बातमी; म्हणाला “लक्ष्मी आली घरी”
त्यांनी त्यांच्या मुलीचे स्वागत कधी केले?
या वर्षी १५ जुलै रोजी कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या मुलीचे स्वागत केले. कियारा आणि सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांसह पालक होण्याची आनंदाची बातमी शेअर केली. या जोडप्याने ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न केले. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांच्या कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.