Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

अभिनेत्री आयशा खानने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला गेला आहे. अभिनेत्रीने ऑनलाइन ट्रोलिंग आणि येणाऱ्या धमक्यांबद्दल देखील मोठा खुलासा आता केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 04, 2026 | 08:47 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा
  • सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य
  • अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचाराचा देखील प्रयत्न
 

अभिनेत्री आयशा खानने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. सार्वजनिक जीवनात आणि महिला सेलिब्रिटी असल्यामुळे दररोज लैंगिक छळापासून ते लैंगिक हिंसेच्या धमक्यांपर्यंत अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते, असे अभिनेत्रीने सांगितले आहे. आयशाने सांगितले की, एकदा तिच्यावर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता, तर दुसऱ्या वेळी एका स्पॉटबॉयने त्यांना अत्यंत त्रासदायक व्हॉइस नोट्स पाठवल्या होत्या. आयशा नुकत्याच ‘किस किसको प्यार करूं 2’ आणि ‘धुरंधर’ या चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्यात चमकली आहे.

‘मोजो स्टोरी’नुसार, आयशा खानने विशिष्ट सौंदर्य निकषांमध्ये बसण्याचा दबाव जाणवतो का, असा प्रश्न विचारण्यात आला असता अभिनेत्रीने आपल्या दिसण्याबाबत आत्मविश्वास असल्याचे सांगितले. मात्र, सोशल मीडियावर तिला कोणत्या प्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागतो, याबद्दलही अभिनेत्री भाष्य करताना दिसली आहे. आयशाने कास्टिंग काउच आणि रिजेक्शनचाही अनुभव घेतल्याचे स्पष्ट केले.

Exclusive: ‘मायबाप प्रेक्षकांचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, साथ लाभावी हीच इच्छा’, – मेघना एरंडे

आयशा खानने केला मोठा खुलासा

अभिनेत्री म्हणाली, “इन्स्टाग्रामवर जवळपास दररोज माझ्या शरीराचे लैंगिकीकरण केले जाते. मी साधा टॉप घातला तरी लोकांना त्यात समस्या दिसते. मी स्कर्ट परिधान केला तरीही टीका केली जाते. त्यामुळे काहीही पोस्ट करण्यापूर्वी मला अनेकदा विचार करावा लागतो. फक्त इतर कोणी माझे लैंगिकीकरण करेल या भीतीने मला काय घालायचे किंवा काय पोस्ट करायचे याचा विचार करावा लागतो, ही खरोखरच अत्यंत दु:खद बाब आहे.”

आयशा खानला मिळाल्या लैंगिक अत्याचाराच्या धमक्या

आयशा खानला अनेकवेळा सोशल मीडियावर लैंगिक अत्याचाराच्या धमक्या मिळाल्या असल्याचे देखील अभिनेत्रीने स्पष्ट केले, याबद्दल सांगताना ती म्हणाली, “हो. दररोज. मी आत्ताच माझा फोन उघडून तुम्हाला दाखवू शकते. आता हे इतकं सामान्य झालं आहे. प्रत्येक मुलाखतीत ट्रोल्स उपस्थित असतात… तुम्हाला याच विषयांवर प्रश्न विचारले जातात आणि त्यापलीकडे काहीच घडत नाही. या गोष्टींवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. ही काही नवीन समस्या नाही, तर शतकानुशतके चालत आलेली आहे.”

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

स्पॉटबॉय पाठवायचा अश्लील व्हॉइस नोट्स

आयशा खानने एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला प्रसंग देखील सांगितला. ती म्हणाली की, त्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होत्या आणि त्या दिवशी त्यांचे वडीलही सेटवर उपस्थित होते. सहज म्हणून अभिनेत्रीने इन्स्टाग्राम उघडले असता तिला काही दिवसांपासून येत असलेला एक मेसेज पुन्हा दिसला. त्या मेसेजमध्ये काही व्हॉइस नोट्स होत्या. नंतर लक्षात आले की तो मेसेज एका स्पॉटबॉयकडून आला होता. हा प्रकार समजताच आयशा खूप घाबरली आणि ती अक्षरशः थरथर कापायला लागली. अभिनेत्रीने त्वरित ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर संबंधित स्पॉटबॉयविरुद्ध कारवाई करण्यात आली आणि तेव्हा आयशाला समाधान वाटले.

Web Title: Ayesha khan reveals she have been attempted to rape spot boy sent dirty voice notes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • Ayesha khan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.