(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मकर संक्रांतीच्या निमित्ताने माधुरीने कोट्यवधी रुपयांची लाल रंगाची फेरारी कार खरेदी केली आहे. १३ जानेवारी रोजी, माधुरी मुंबईत पती नेनेसोबत एका आकर्षक काळ्या ड्रेसमध्ये दिसली. पापाराझींनी त्या दोघांनाही त्यांच्या व्हिडिओमध्ये कैद केले. यादरम्यान, माधुरी आणि राम नेने यांनी त्यांच्या नवीन लक्झरी फेरारीसह अनेक पोझ दिल्या आहेत. हा अभिनेत्रीची ही नवी आलिशान कार पाहून चाहते चकित झाले आहेत. तसेच अभिनेत्रीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माधुरीने खरेदी केली फेरारी
सोमवार, १३ जानेवारी रोजी, मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी, माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने मुंबईत त्यांच्या आकर्षक लाल फेरारीमध्ये फिरताना दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरीने फेरारी २९६ जीटीएस खरेदी केली आहे, ज्याची किंमत ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कार पाहताना चाहत्यांना चकित करत आहेत. अनेक लोक या कारचे वेडे आहेत. आणि अश्यातच आता ही आलिशान कार अभिनेत्री माधुरी दीक्षितने खरेदी केली आहे. हे पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाला
इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये माधुरी तिचा पती रामसोबत लाल रंगाची फेरारी चालवताना दिसत आहे. यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. माधुरीने चमकदार काळा गाऊन घातला आहे, तर तिचे पती आणि डॉ. राम यांनी स्टायलिश काळा सूट घातला आहे. हे दोघेही या फेरारी मध्ये बसून फिरताना दिसत आहेत.
माधुरीच्या कलेक्शनमध्ये अनेक गाड्यांचा समावेश आहे.
माधुरी आणि डॉ. नेने यांच्या कार कलेक्शनमध्ये आधीच अनेक उच्च दर्जाच्या गाड्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरीकडे मर्सिडीज मेबॅक एस ५६० देखील आहे ज्याची किंमत सुमारे २.५ कोटी रुपये आहे. आता त्यात फेरारी २९६ जीटीएसचा देखील समावेश झाला आहे. मर्सिडीज एस-क्लास ४५०, किंमत सुमारे १.३ कोटी रुपये, स्कोडा ऑक्टाव्हिया व्हीआरएस, किंमत २६.२९ लाख रुपये, इनोव्हा क्रिस्टा, किंमत ९.५ लाख रुपये, रेंज रोव्हर वोग, किंमत सुमारे ३ कोटी रुपये, मर्सिडीज जीएलएस ३५० डी, किंमत रु. ८८ लाख आणि रेंज रोव्हर स्पोर्ट्स, ज्याची किंमत ९१ लाख ते २.१ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, माधुरी शेवटची कार्तिक आर्यन आणि विद्या बालनसोबत ‘भूल भुलैया ३’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसली होती.