(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मलायका अरोरा आणि अरबाज खान या दोघांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. अरबाज शुरा खानसोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. मलायका तिच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. अरबाजपासून घटस्फोट झाला असला तरी, मलायकाचे त्याच्या कुटुंबाशी असलेले नाते अबाधित आहे. अलीकडेच, मलायकाने अरबाजच्या बहिणींसाठी जेवणाचे आयोजन केले होते. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संपूर्ण खान कुटुंबातील महिला या पार्टीत एकत्र दिसल्या आहेत.
आधी पायाला केला स्पर्श अन् घेतला आशीर्वाद, नंतर आदराने…; रणवीरचा वृद्ध महिलेसोबतचा खास Video पाहाच!
अलविरा-अर्पिता एक्स वाहिनीच्या निमंत्रणावरून पोहोचल्या
मलायका अरोराने तिच्या एक्स नणंद अलविरा खान अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मा यांना जेवणासाठी आमंत्रित केले. मलायकाच्या निमंत्रणावरून सलमान खानच्या दोन्ही बहिणी त्यांच्या मुलांसह तिथे उपस्थित झाल्या. मलायकाने तिच्या नवीन रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे आयोजन केले. यादरम्यान, सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेह देखील मुलगा निर्वाणसोबत दिसली. ‘खान’ कुटुंबामधील महिलांनी जेवणाच्या बहाण्याने एक उत्तम मेळावा केला, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचे निधन, ‘या’ गंभीर आजाराने होते ग्रस्त
निर्वाणच्या खुशीत दिसली अर्पिताची मुलगी आयत
यावेळी अरबाज खान आणि मलायकाचा मुलगा अरहान खान, सोहेल खान आणि सीमा सजदेहचा मुलगा निर्वाण खान देखील उपस्थित होते. याशिवाय अर्पिताची दोन्ही मुले दिसली. अलविरा तिच्या दोन्ही मुलांसोबत – अयान आणि अलिझेह देखील दिसली. अर्पिताची मुलगी आयत सोहेलचा मुलगा निर्वाणच्या खुशीत दिसली आहे. यावेळी अरबाज खानच्या बहिणींसह, मलायकाची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा देखील उपस्थित होत्या. सर्वांनी पापाराझींसाठी पोज देखील दिल्या.
मलायका अरोरा आणि अरबाज खानचा झाला घटस्फोट
मलायका अरोरा आणि अरबाज खान या दोघांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. अरबाज शुरा खानसोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. आणि त्यांना एक मुलगा आहे ज्याचे अरहान खान आहे. नंतर डिसेंबर २०२३ मध्ये, अभिनेत्याने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसरे लग्न केले आणि आता असे वृत्त आहे की हे जोडपे लवकरच आई वडील होणार आहेत. अरबाज आणि मलायकाचे नाते संपले असेल, पण दोघेही त्यांच्या मुलाच्या संगोपनात तितकेच सहभागी आहेत.