Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मल्याळम अभिनेते मोहन राज यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन, खलनायकाच्या भूमिकेसाठी होते लोकप्रिय!

साऊथ सिनेमातून एक वाईट बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहन राज यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. खलनायक म्हणून त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले आहे. त्यांनी 1988 मध्ये मल्याळम चित्रपट 'मूनम मुरा'मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 04, 2024 | 11:13 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

ज्येष्ठ अभिनेते मोहन राज, हे त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध आहेत. याचदरम्यान चाहत्यांसाठी आता दुःखाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याचे ३ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. मोहन राज यांच्या निधनाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. मल्याळम, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमधील कामासाठी ते ओळखले जात होते. शुक्रवार, ४ ऑक्टोबर रोजी केरळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

खलनायकाची भूमिका करून अभिनेता झाला प्रसिद्ध
ते दीर्घकाळापासून पार्किन्सन्स आणि मधुमेहाने त्रस्त होते. तिरुअनंतपुरम येथून त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू होते. तीन दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत मोहन राज यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र खलनायकाच्या भूमिकेतून त्यांना विशेष ओळख मिळाली. उप्पुकंदम ब्रदर्स, चैनकोल, आराम थंपुरन आणि नरसिंहममधील भूमिकांसाठी अभिनेता अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मोहन राज यांना त्यांच्या दमदार आवाज आणि अभिव्यक्तीमुळे दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका मिळायची आणि त्यात ते खूप यशस्वी झाले.

दिनेश पणीकर यांनी शोक व्यक्त केला
अभिनेते आणि दिग्दर्शक दिनेश पणीकर यांनी सोशल मीडियावर मोहन राज यांच्या निधनाची बातमी शेअर करत दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, मोहन राज यांचे दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी निधन झाले आणि त्यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशी तिरुअनंतपुरम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घोषणेनंतर, सहकारी कलाकार, चित्रपट निर्माते आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. अभिनेत्याचे चित्रपटसृष्टीतील योगदान सर्वांनाच आठवत आहे. साऊथ चित्रपटसृष्टी पूर्णपणे भावून झाली आहे.

हे देखील वाचा- ‘धर्मवीर २’ ची नवरात्रीनिमित्त खास भेट; ४ ऑक्टोबरला बघा अवघ्या ९९ रुपयात

अभिनेता सैन्यातही होता
मोहन राज यांचा जन्म केरळमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी अर्थशास्त्रातून पदवी प्राप्त केली, त्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी ते भारतीय सैन्यात दाखल झाले. मात्र, पायाला दुखापत झाल्याने त्यांना सैन्य सोडावे लागले. यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि ईडी (अंमलबजावणी संचालनालय) साठी काम करण्यास सुरुवात केली. 1988 मध्ये त्यांनी मल्याळम चित्रपट ‘मूनम मुरा’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले. आणि या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम करून चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले.

Web Title: Malayalam actor mohan raj popular by his stage name keerikkadan jose passes away at 70

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • malayalam actor

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.