फोटो सौजन्य - Social media
शिवसेनेचे दिवंगत नेते, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढील भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला सर्वत्र मिळत असून आजपर्यंत चित्रपटाने तब्बल १२.२८ कोटींचा गल्ला कमावला आहे.
हे देखील वाचा : यंदा नवरात्रीमध्ये आत्मसात करा ‘या’ ७ आरोग्यदायी सवयी, शरीराला होतील फायदे
१५०० पेक्षा ही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली. ‘नाथा घरच्या आनंदाची गोष्ट’, ‘व्हू इज एकनाथ शिंदे सांगणारी दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट’, चरित्रपटातून प्रखर हिंदूत्वाचा जागर…. अशा शब्दांत समीक्षकांनीही चित्रपटाला गौरवले आहे. धर्मवीर चित्रपटानंतर “धर्मवीर २” चित्रपटात नक्की काय दाखवले जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक प्रतिसादातून दिसून येत आहे. प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या चित्रपटानं दिली असून, ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना ती योग्य प्रकारे मिळाली आहेत
महिला वर्गाचा चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षणीय असून चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबच चित्रपटगृहात जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे,पालघर नाही तर पुणे,कोल्हापुर, इचलकरंजी, नाशिक, छ.संभाजीनगर, मराठवाडा अशा संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल यात शंका नाही. महाराष्ट्रभरामध्ये उत्तम प्रतिसाद सिनेम्याला मिळत आहे. चित्रपटामध्ये खऱ्या आयुष्यातील पात्रांनी मध्ये भूमिका निभावल्या आहेत, जे सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचे डायलॉग्स आणि काही दृश्य प्रचंड वेग धरत आहेत. चित्रपटाला प्रेक्षवर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.