(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आशुतोष गोवारीकर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘मानवत मर्डर्स’ला चाहते आणि समीक्षकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आशुतोषच्या वास्तविक जीवनातील डीसीपी रमाकांत कुलकर्णीच्या भूमिकेने मनोरंजन उद्योगाला तुफान नेले आहे आणि त्याच्यासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘मानवत मर्डर्स’ हि नुकतीच रिलीज झालेली सोनी लिव्हवरील वेब सिरीज आहे. या सिरीजला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ही रोमांचक थ्रिलर सिरीज १९७०च्या दशकात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडलेल्या कुप्रसिद्ध हत्याकांडाला प्रकाशझोतात आणते. या सिरीजमध्ये प्रतिभावान कलाकारांसह राष्ट्रीय पुरस्कार-विजेते कलाकार देखील आहेत. या सिरीजला चाहत्यांसह अनेक कलाकारांचे देखील प्रतिसाद येत आहेत.
अभिनेत्याची प्रशंसा करणाऱ्यांमध्ये अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर देखील मागे राहिला नाही आहे, त्याने सोशल मीडियावर आपली प्रशंसा शेअर केली आणि लिहिले, “हे पाहून खरोखर आनंद झाला. आशिष बेंडे, गिरीश जोशी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरेचे अभिनंदन आणि खूप आनंद झाला तुम्हाला पाहून.” टीम आणि आशुतोष गोवारीकर पुन्हा अभिनेत्याच्या भूमिकेत पाहून छान वाटले आहे.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हे देखील वाचा – ‘किंग’ चित्रपटात पहिल्यांदाच ‘या’ भूमिकेत दिसणार शाहरुख खान, मुलगी सुहाना सोबत बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला
राग आणि संयम यांच्यातील बारकावे अतिशय प्रभावीपणे मांडत आशुतोषच्या कामगिरीने पोलिस अधिकाऱ्याचा नवा नमुना समोर आणला आहे. या शोने सर्व प्रकारच्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच आशुतोष गोवारीकर यांनी हे सिद्ध केले आहे की ते केवळ एक चित्रपट निर्माता नाही तर एक शक्तिशाली अभिनेता देखील आहे. त्यांच्या अभिनयाने छाप सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही; ‘मानवत मर्डर्स’ याच्या आधीही त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘व्हेंटिलेटर’ चित्रपट आणि नेटफ्लिक्स शो ‘काला पानी’मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. या प्रकल्पांमधील त्यांच्या भूमिकांचेही खूप कौतुक केले जात आहे, ज्यामुळे त्याचे अष्टपैलुत्व आणि खोली अधोरेखित झाली आहे.