
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बँकॉकमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धेची विजेती ठरली आहे. स्पर्धेचा अंतिम सोहळा थायलंडच्या प्रमुख शहरात धूमधाम आणि मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी मेक्सिकोच्या फातिमा बॉश हिने मिस युनिव्हर्स २०२५ ही स्पर्धा जिंकली आहे. मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धेत इतर सर्वांना मागे टाकत तिने हा मुकुट जिंकला आहे. तिचा प्रवास चित्रपटासारखा होता, कधीकधी वादात अडकलेला तर कधीकधी रिहर्सल दरम्यान बाहेर पडणारा. तिच्या जोरदार पुनरागमनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः प्रश्नोत्तरांच्या फेरीत तिच्या उत्तरांनी सर्वांची मने जिंकली. तिने महिलांच्या आव्हानांबद्दल आणि धाडसाबद्दल इतके स्पष्टपणे सांगितले की संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तिच्या आत्मविश्वासपूर्ण वागण्याने आणि योग्य शब्दांनी तिला या वर्षीची खरी मिस युनिव्हर्स बनवले.
फातिमा बॉश फर्नांडिस २५ वर्षांची एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व, जी टबास्को येथील सॅंटियागो दे टिप शहराची रहिवासी आहे, ती मेक्सिकोच्या पहिल्या मिस युनिव्हर्स ठरली आहे. फातिमाने १३ सप्टेंबर २०२५ रोजी ग्वाडालजारा येथे झालेल्या मिस युनिव्हर्स मेक्सिको स्पर्धेत विजेतेपद पटकावून आपल्या यशाची शिखर गाठली.फातिमाने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले असून, तिला या क्षेत्रात एक प्रगतीशील डिझायनर म्हणून ओळखले जाते. तिच्या कलेला आणि डिझाईनची खासियत हे तिने अनेक प्लॅटफॉर्मवर सिद्ध केले आहे. तिने २०१८ मध्ये टबास्को येथे ‘फ्लोर दे ओरो’ हा किताब देखील जिंकला होता.
मिस युनिव्हर्स २०२५ पर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. मिस युनिव्हर्सच्या मंचावर थाई स्पर्धेचे आयोजक नवाट इत्सारग्रिसिल यांनी तिला टोमणे मारले तेव्हा वाद निर्माण झाला. त्यांनी फातिमाला सोशल मीडिया प्रमोशनमध्ये भाग न घेतल्याबद्दल जाहीरपणे फटकारले, तिला “मूर्ख” देखील म्हटले. त्यानंतर तिला मिळालेल्या वागणूकीमुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली.तर नवाट इत्सारग्रिसिलने दुसऱ्याच दिवशी जाहीरपणे माफी मागितली.
Box Office Prediction: ‘120 बहादुर’ आणि ‘मस्ती 4’ ची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी किती कमाई होईल?
मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, यात विचारण्यात आले की तरुण मुलींना सक्षम करण्यासाठी मिस युनिव्हर्स प्लॅटफॉर्मचा वापर कसा करतील यासह अनेक प्रश्न विचारण्यात आले. फातिमा बॉश म्हणाली , “स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची स्वप्ने महत्त्वाची आहेत, तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत आणि कोणालाही तुमच्या योग्यतेवर शंका घेऊ देऊ नका.”
भारताचे Miss Universe 2025 चे स्वप्न राहिले अपुरे, २२ वर्षीय मनिका विश्वकर्मा टॉप १२ मधून पडली बाहेर
Miss Universe 2025 बक्षिसाची रक्कम किती?
मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने या वर्षीच्या बक्षीस रकमेची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार, विजेत्याला सुमारे २,५०,००० डॉलर्स देण्यात येतील.