(फोटो सौजन्य - x अकाउंट)
मिस वर्ल्ड स्पर्धेच्या ७२ व्या ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. या स्पर्धेत परीक्षक म्हणून बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांनी हजेरी लागली होती. तसेच अभिनेत्याने या स्पर्धेच्या वेळी विजेत्या ओपल सुचाता चुआंगश्री यांना एक प्रश्न विचारला, ज्याचे तिने स्पष्ट उत्तर दिले आणि सर्वांचे मन जिंकले. आता सोनू सूद यांनी काय प्रश्न विचारला आणि त्याच उत्तर मिस वर्ल्ड विजेता ओपल सुचाता यांनी काय दिले जाणून घेऊयात.
थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्री यांनी ७२ व्या मिस वर्ल्ड पेजेंटच्या ग्रँड फिनालेमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे मन जिंकले. या दरम्यान, बॉलीवूड अभिनेता आणि अंतिम फेरीत परीक्षक सोनू सूद यांनी ओपल यांना एक खास प्रश्न विचारला, ज्याचे ओपल सुचाता चुआंगश्री यांनी अतिशय प्रभावी उत्तर दिले आणि प्रेक्षकांना आणि परीक्षकांना खूप प्रभावित केले.
सोनू सूदने विचारला हा प्रश्न
सोनू सूदने ओपलला विचारले, ‘या प्रवासाने तुम्हाला सत्य आणि वैयक्तिक जबाबदारीबद्दल काय शिकवले आहे, ज्यामुळे कथा कशा सांगितल्या जातात यावर परिणाम होतो?’ ओपलने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले, ‘मिस वर्ल्डमध्ये असणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी आहे. या प्रवासात मी गोष्टींकडे कसे पहावे हे शिकली आहे आणि ती माझी जबाबदारी आहे.’
FINAL ROUND
She absolutely nailed it.
The crown is calling her name – no doubt! 👑
OPAL SUCHATA CHUANGSRI
Representing Thailand with pride – Miss World Thailand 2025#MissWorldThailand2025#MissWorld2025#72ndMissWorld
pic.twitter.com/VmE5yGFVf3— IndiaPulse: News & Trends (@IndiaPulseNow) May 31, 2025
आपण नेहमीच लोकांचे प्रेरणास्थान असणे महत्वाचे
ती पुढे म्हणाली की, ‘मला वाटते की आपण येथे सर्वात मोठी गोष्ट करू शकतो ती म्हणजे आपण सर्व लोकांसाठी प्रेरणास्थान बनणे, मग ते मुले असोत, प्रौढ असोत किंवा अगदी आपले स्वतःचे पालक असोत, जे आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाहतात.’ ओपल यांनी यावर भर दिला की कोणतीही व्यक्ती, त्याचे वय किंवा पदवी काहीही असो, त्याला नेहमीच त्याच्याभोवती कोणीतरी सापडते जे त्याच्याकडून प्रेरणा घेते.ओपल म्हणाली की ‘लोकांचे नेतृत्व करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या कृतींमध्ये त्यांची कृपा आणि शालीनता राखणे. आपल्या जगात आपण करू शकणारी ही सर्वात मोठी गोष्ट आहे.’ असं ती म्हणाली. तिचे हे उत्तर केवळ तात्विक नव्हते, तर वैयक्तिक जबाबदारी आणि सत्य कथांना कसे आकार देते हे देखील दर्शविले.
सलमान खानच्या कडेवर दिसणारा हा मुलगा कोण ? सलमानच्या नायिकेचा नवरा आहे हा अभिनेता….;
सोनू सूदने कौतुक केले
सोनू सूदने ओपलच्या उत्तराचे कौतुक केले आणि म्हटले की ‘तुम्ही खूप सुंदर आणि खोल उत्तर दिले आहे. हे स्पष्ट आहे की तुम्ही केवळ बाह्य सौंदर्यानेच नव्हे तर अंतर्गत सौंदर्य आणि बुद्धिमत्तेनेही समृद्ध आहात.’ तिच्या उत्तराने प्रेक्षक आणि परीक्षकांना खूप प्रभावित केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते आता तिचे कौतुक करत आहेत.