सलमान खान नेहमी आपल्या अभिनयासाठी प्रसिद्धीत असतात. आता सलमान खानचा सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. सलमान खानच्या कडेवर एक लहान मुलगा आहे. तो लहान मुलगा आज बॉलिवूडमध्ये नावाजलेला अभिनेता आहे. सलमानचे त्याच्याशी खास नाते आहे. या अभिनेत्यासोबत सलमानचे अनेक फोटो देखील आहेत. आणि या अभिनेत्याची बायको सलमान खानची नायिका देखील राहिली आहे. ओळखलंत का कोण आहे हा अभिनेता?
चाळिशीनंतर कपूर घराण्याची लेक करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली….
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो सलमानच्या तरुणपणाचा असून त्याच्या कडेवर असलेला लहान मुलगा मात्र आता एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
Being Launched Tomorrow … KAL dekhte hai yeh ladka AAJ kaise dikhta hai … pic.twitter.com/2VpmWvD9J8
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 30, 2018
सलमानने केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या कडेवर एक लहान मुलगा आहे. सलमानने स्वतः हा फोटो त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले आहे “उद्या लाँच होत आहे… उद्या पाहूया हा मुलगा आज कसा दिसतोय…”. हा मुलगा कोण आहे ते ओळखणं कठीण जात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फोटोतील हा लहान मुलगा आज नावाजलेला अभिनेता आहे. त्याच्या पत्नीने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका देखील साकारली आहे.
एक नाही तर अनेक फोटो आहेत
त्या अभिनेत्याचं नवा आहे अभिनेता झहीर इकबाल. जो आता अभिनेत्री सोनाक्षी सिंहाचा पती आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जावई आहे. कमेंटमध्ये सगळ्या नेटकऱ्यांनी हेच म्हटलं आहे. तसेच सलमान खानच्या या पोस्टरवर भरभरून प्रतिसाद दिला आहे. सलमान खानसोबत झहीर इक्बालचे लहान असतानाचे अनेक फोटो आहेत. एवढच नाही तर आताही सलमान आणि झहीरमधलं नातं तेवढंच खास आहे. हे अनेक पोस्टमधून समोर आलं आहे.
झहीर इक्बाल एक प्रसिद्ध अभिनेता आहे, तो नोटबुक चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. तो प्रनूतन बहलसोबत नोटबुकमध्ये दिसला.
“26 इंची कंबर, हो मी दिसतेच पुरुषासारखी मग….” ; क़ॉमेडी क्वीनने सांगितला तिच्या आयुष्यातील तो किस्सा